अशी रंगली सोनम कपूरची संगीत सेरेमनी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 11:11 IST2018-05-08T05:41:01+5:302018-05-08T11:11:35+5:30

सोमवारी संध्याकाळी सोनम कपूरची संगीत सेरेमनी वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडली. या संगीत सेरेमनीला सफेद रंगाची थीम ठेवण्यात आली ...

Sonam Kapoor's music serame! | अशी रंगली सोनम कपूरची संगीत सेरेमनी!

अशी रंगली सोनम कपूरची संगीत सेरेमनी!

मवारी संध्याकाळी सोनम कपूरची संगीत सेरेमनी वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडली. या संगीत सेरेमनीला सफेद रंगाची थीम ठेवण्यात आली होती. सफेद कलरच्या लहंगामध्ये सोनम कपूर खूपच सुंदर दिसत होती. तिचा लहंगा फॅशन डिझायनर संदीप खोसला आणि अबू जानी यांनी डिझायन केला होता. आनंद अहुजाने देखील  सफेद आणि गोल्डन रंगचा कुर्ता घातला होता. सोनमच्या सगळ्या कझिन्सनेसुद्धा सफेद रंगाचे लहंगा परिधान केला होता. सोनमच्या संगीत सेरेमनीमध्ये तिचे बी-टाऊनमधले मैत्रिण-मैत्रिणीसुद्धा सहभागी झाल्या होत्या. स्वरा भास्कर, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण धवनदेखील ठुमके लावले. करिश्मा कपूर आणि शिल्पा शेट्टीसुद्धा संगीत सेरेमनीमध्ये आल्या होत्या. अनिल कपूर लाडक्या लेकीच्या लग्नात भांगडा करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. सोनमची आई सुनिताने आपल्या लाडक्या जावयासोबत चांगलाचा ताल ठरला होता. 


आज सोनम कपूर आनंद अहुजा लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकार सोनमच्या लग्नाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. सोनमची वेडिंग सेरेमनीआण्टी आणि इंटीरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडणार आहे.



लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत. त्यानंतर दिल्लीत देखील जंगी रिसेप्शन होणार आहे. आनंद अहुजा हा दिल्लीचा असल्यामुळे मुंबईनंतर दिल्लीतदेखील सेलिब्रेशन होणार आहे.   



आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून आहे. मात्र सोनम आणि आनंदने कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले नाही. दोघीनीही नाते प्रायव्हेट ठेवले होते. मात्र त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. आनंद देशातील सर्वात मोठ्या एक्सपोर्ट हाउस म्हणजे शाही एक्सपोर्टचे मालक हरिष आहुजाचा यांचा मुलगा आहे. आनंद या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. हा त्याचा फॅमिली बिझनेस आहे.

Web Title: Sonam Kapoor's music serame!