ऐकलं का? सोनम कपूर ‘मुन्नाभाई 3’ करणार पण या एका अटीवर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 13:18 IST2019-01-31T13:17:46+5:302019-01-31T13:18:36+5:30

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या आगामी चित्रपटातील सोनमचे काम विधू विनोद यांना म्हणे इतके आवडले की, त्यांनी ‘मुन्नाभाई 3’मध्ये तिलाच साईन करण्याचा विचार केला.

sonam kapoor will work on munna bhai 3 but has this one condition | ऐकलं का? सोनम कपूर ‘मुन्नाभाई 3’ करणार पण या एका अटीवर!!

ऐकलं का? सोनम कपूर ‘मुन्नाभाई 3’ करणार पण या एका अटीवर!!

ठळक मुद्देसोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ उद्या १ फेबु्रवारीला रिलीज होतोय. या चित्रपटात सोनमशिवाय अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला मुख्य भूमिकेत आहेत.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग अर्थात ‘मुन्नाभाई 3’ याचवर्षी फ्लोरवर येणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्शद वारसी याने खुद्द याचा खुलासा केला होता. काल या चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी आली. ती म्हणजे, निर्माता विधू विनोद चोप्रा या चित्रपटात सोनम कपूरला घेऊ इच्छितात अशी. होय, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या आगामी चित्रपटातील सोनमचे काम विधू विनोद यांना म्हणे इतके आवडले की, त्यांनी ‘मुन्नाभाई 3’मध्ये तिलाच साईन करण्याचा विचार केला. या बातमीने चाहते सुखावले असताना आज आणखी एक बातमी आली. त्यानुसार, सोनम म्हणे ‘मुन्नाभाई 3’ करायला तयार आहे पण एका अटीवर.

सोनम सध्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एक प्रमोशनल इव्हेंटमध्ये सोनमला ‘मुन्नाभाई 3’बद्दल छेडले गेले. यावर ती जे काही बोलली ते ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. होय, ‘मुन्नाभाई 3’मध्ये काम करायला मला आवडले. पण एका अटीवर. ती म्हणजे, या चित्रपटाचे नाव ‘मुन्नाभाई 3’ऐवजी ‘मन्नी बहन’ असेल तरच, असे ती सोनम म्हणाली. आता सोनमला यावरून काय सुचवायचे आहे, हे तीच जाणो.

एकतर तर तिला ‘मुन्नाभाई 3’मध्ये जराही इंटरेस्ट नसावा किंवा केवळ महिलाप्रधान चित्रपट करण्यातचं रस असावा. सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ उद्या १ फेबु्रवारीला रिलीज होतोय. या चित्रपटात सोनमशिवाय अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: sonam kapoor will work on munna bhai 3 but has this one condition