‘साहो’साठी सोनम कपूर होती का मेकर्सची पहिली पसंत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 12:49 IST2017-06-30T07:19:55+5:302017-06-30T12:49:55+5:30
‘बाहुबली2’च्या अभूतपूर्व यशानंतर सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झालेला प्रभास लवकरच ‘साहो’मध्ये दिसणार आहे. ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा ‘साहो’मधील अॅक्शन अवतार पाहण्यासाठी सगळेच ...
.jpg)
‘साहो’साठी सोनम कपूर होती का मेकर्सची पहिली पसंत?
‘ ाहुबली2’च्या अभूतपूर्व यशानंतर सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झालेला प्रभास लवकरच ‘साहो’मध्ये दिसणार आहे. ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा ‘साहो’मधील अॅक्शन अवतार पाहण्यासाठी सगळेच आतूर आहेत. ‘साहो’मध्ये अनुष्का शेट्टी व प्रभासची जोडी पुन्हा दिसणार, ही सुद्धा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण ‘साहो’साठी अनुष्का नाही तर बॉलिवूडची एक अभिनेत्री ही पहिली पसंती होती. होय, ही अभिनेत्री आहे सोनम कपूर.
‘साहो’च्या मेकर्सने या चित्रपटासाठी सोनम कपूरलाही विचारणा केली होती. विशेष म्हणजे पहिल्या भेटीनंतर सोनम ‘साहो’च्या मेकर्ससोबत दुसरी भेट करायलाही तयार झाली होती. पण यानंतर माशी कुठे शिंकली ते कळायला मार्ग नाही. पण यानंतर मेकर्सने सोनमशी ना पुढची भेट केली, ना यानंतर सोनममध्ये फार इंटरेस्ट दाखवला. यापश्चात सोनमला ‘साहो’मध्ये कास्ट करण्याची चर्चा तिथेच थांबली. आता या चित्रपटात सोनमला पाहायला तुम्हाला आवडले असते की, अनुष्का शेट्टी हीच तुमची पसंती आहे, हे आम्हाला सांगायला विसरू नका. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.
ALSO READ : तमन्ना भाटियासाठी प्रभास करणार ‘हे’ काम!
‘साहो’ हा एक थ्रीलर सन्सेन्स चित्रपट आहे. यात प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. यात नील नितीन मुकेश खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा ब्लॉकबस्टर चित्रपट २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.चित्रपटात प्रचंड अॅक्शन स्टंट बघायला मिळणार आहेत. ज्याकरिता इंटरनॅशनल स्टंट्समॅनला नुकतेच आॅन बोर्ड घेण्यात आले आहे.या चित्रपटाचे बजेट तब्बल १५० कोेटी रुपये आहे. या चित्रपटाचा टीजर ‘बाहुबली2’ रिलीजच्या वेळीच रिलीज करण्यात आला होता.