क्या बात है...! लॉकडाउनमध्ये सोनम कपूरने शेअर केले ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 20:01 IST2020-05-04T20:00:23+5:302020-05-04T20:01:00+5:30
सोनम कपूरने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

क्या बात है...! लॉकडाउनमध्ये सोनम कपूरने शेअर केले ग्लॅमरस फोटो
सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत दिल्लीतील आपल्या सासरी आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सोनम व आनंद दोघेही दिल्लीत आहेत. नुकतेच सोनम कपूरने तिचे थ्रोबॅक फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनम कपूरने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
कधी ती बेडवर पडून पोज देताना दिसते आहे तर कधी फोन कानाला लावून पोज देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
सोनम बऱ्याच काळ दिल्लीत असल्यामुळे ती बहिण व घरातल्यांना मिस करते आहे आणि तिने तशी पोस्टदेखील इंस्टाग्रामवर शेअर केली होती.
कोरोनाचा धोका असतानाही सोनम व आनंदने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे गत 19 मार्चला लंडनवरून भारतात परतले होते. यानंतर दोघांनीही सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे 'जोया फॅक्टर' या सिनेमात सोनम दिसली होती.
यानंतर ती सुजॉय घोष यांच्या चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाचे नांव 'ब्लाइंड' असल्याचे कळतेय.