दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर सोनम कपूरने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो, म्हणते- "नीता काकू तुम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:49 IST2026-04-03T12:48:53+5:302026-04-03T12:49:43+5:30

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर सोनमने बाळासोबतचा पहिला फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

sonam kapoor shared first photo with her new born baby boy thanks neeta ambani | दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर सोनम कपूरने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो, म्हणते- "नीता काकू तुम्ही..."

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर सोनम कपूरने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो, म्हणते- "नीता काकू तुम्ही..."

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोनमने २९ मार्चला दुसऱ्या बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावरुन सोनमने चाहत्यांना दिली. आता दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर सोनमने बाळासोबतचा पहिला फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

सोनमने शेअर केलेल्या हॉस्पिटलमधल्या फोटोंमध्ये तिच्या नवजात बाळाची झलक पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सोनमने तिच्या बाळाला जन्म दिला. पोस्टमध्ये ती म्हणते, "आमच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मावेळी आम्हाला दिलेल्या सेवेबद्दल आणि केलेल्या मदतीबद्दल एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे आभार. माझ्या दोन्ही प्रेग्नंसीच्या काळात मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार. त्यांच्या बोलण्यात विश्वास, शांतता आणि दिलासा मिळतो. त्यांचा पाठिंबा आणि काळजीसाठी मी त्यांना धन्यवाद देते. संपूर्ण टीमचे आभार. तुम्ही दाखवलेली सहानुभुती, मनापासून केलेली सेवा हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी गरजेचा असतात तो अनुभव इथे मिळाला. उत्कृष्टता आणि करुणा एकाच वास्तूत नांदतात अशी जागा नीता काकू(नीता अंबानी) तुम्ही खरोखरच निर्माण केली आहे". 


सोनम आणि आनंद यांची पहिली भेट २०१४ मध्ये झाली होती. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आनंदने सोनमला प्रपोज केले आणि २०१८ मध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडकले. आनंद आहुजा हा एक यशस्वी उद्योजक आहे. लग्नानंतर ४ वर्षांनी सोनमने वायू या त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. आता पुन्हा त्यांच्या घरात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. 

Web Title : सोनम कपूर ने बच्चे के साथ पहली तस्वीर साझा की, नीता अंबानी को धन्यवाद

Web Summary : सोनम कपूर ने अपने दूसरे बच्चे को जन्म देने के बाद बच्चे के साथ एक तस्वीर साझा की। उन्होंने अस्पताल के कर्मचारियों और नीता अंबानी को गर्भावस्था के दौरान उनके समर्थन और देखभाल के लिए धन्यवाद दिया। सोनम और आनंद ने 2018 में शादी की और चार साल बाद उनका पहला बच्चा, वायु हुआ।

Web Title : Sonam Kapoor Shares First Photo with Baby, Thanks Nita Ambani

Web Summary : Sonam Kapoor, after giving birth to her second child, shared a photo with the baby. She thanked the hospital staff and Nita Ambani for their support and care during her pregnancy. Sonam and Anand married in 2018 and had their first child, Vayu, after four years.