सोनम कपूर म्हणते, मी ‘त्या’ दोघींना ओळखत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 18:00 IST2019-06-09T18:00:00+5:302019-06-09T18:00:01+5:30

सोनमचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने अभिनेत्री दीपिका आणि कॅटरिना  कैफला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. 

Sonam Kapoor says, I do not know both of them | सोनम कपूर म्हणते, मी ‘त्या’ दोघींना ओळखत नाही

सोनम कपूर म्हणते, मी ‘त्या’ दोघींना ओळखत नाही

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. सोनम कायमच तिचं मत आणि मुद्दे स्पष्टपणे मांडत असते. अभिनेत्री कंगना रणौत, कॅटरिना कैफ, शोभा डे, अभय देओलसह तिचे अनेक कलाकारांसोबत मतभेद आहेत. त्यातच आता सोनमचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने अभिनेत्री दीपिका आणि कॅटरिना  कैफला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. 

सोनमने काही वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला असून तो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने कॅटरिना, दीपिकाला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. या मुलाखतीमध्ये सोनमला तिच्या करिअर आणि पर्सनल लाईफविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये तिला तिची मैत्रीण कोण? कोणासोबत मैत्री करायला आवडेल? यासारखे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देतांना तिने ‘राणी माझी जवळची मैत्रीण असून असिनसोबतदेखील मैत्री करु शकते’, असं सांगितलं होतं. मात्र दिपिका आणि कॅटरिना कोण आहेत ? असा प्रतिप्रश्नही तिने विचारला.

‘राणी माझी चांगली मैत्रीण आहे. एकदा तिला बरं नसताना मी रात्री तिच्यासाठी औषधं घेऊन तिच्या घरी गेले होते. तर अभिनेत्री असिन माझी प्रतिस्पर्धी आहे, मात्र तिच्याशीही मी मैत्री करु शकते. मात्र दीपिका आणि कॅटरिनाला मी ओळखत नाही. कतरिना माझ्या भावाची अर्जुनची चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही भावंड एकमेकांच्या मैत्रीमध्ये फूट पाडत नाही,’ असं सोनम यावेळी म्हणाली.

Web Title: Sonam Kapoor says, I do not know both of them