Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:34 IST2025-11-20T12:33:12+5:302025-11-20T12:34:15+5:30
Sonam Kapoor Announces Pregnancy : सोनमच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. आता त्यावर अभिनेत्रीने स्वत: शिक्कामोर्तब केलं आहे. सोनमने नुकतंच एक फोटोशूट पोस्ट केलं असून त्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे. या पोस्टमधून तिने दुसऱ्या प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा केली आहे. तिने पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शननेही लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. गुलाबी वनपीस, ब्लेझर, स्टॉकर्स या बॉसी लूकमध्ये सोनमने फोटो पोस्ट केलेत. बहीण रिया कपूरनेच सोनमला स्टाईल केलं आहे. यामध्ये तिने बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. बेबी बंपवर हात ठेवलेले तिने फोटो आहेत. mother असं कॅप्शन तिन दिलं आहे.
सोनमच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसंच चाहतेही सोनमची गुडन्यूज पाहून खूश झाले आहेत. सोनम वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तीन वर्षांपूर्वी २०२२ साली सोनमने मुलाला जन्म दिला होता. त्याचं नाव 'वायू' आहे. आता सोनम दुसऱ्यांदा आई होणार असल्याने आनंदी आहे. तर बिझनेसमन आनंद आहुजाचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तसंच अनिल कपूर दुसऱ्यांदा आजोबा होणार असल्याने खूपच उत्साहित आहेत. पुढील वर्षी कपूर आणि आहुजा कुटुंबात छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.