सोनम कपूरने एक्स बॉयफ्रेंडलाही दिले लग्नाचे निमंत्रण; ब्रेकअपनंतर केले होते गंभीर आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 11:18 AM2018-05-03T11:18:29+5:302018-05-03T16:48:29+5:30

सध्या कपूर परिवारात अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या ८ मे रोजी सोनम बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत ...

Sonam Kapoor also invited the ex-boyfriend to the wedding; After the breakup, serious charges were made! | सोनम कपूरने एक्स बॉयफ्रेंडलाही दिले लग्नाचे निमंत्रण; ब्रेकअपनंतर केले होते गंभीर आरोप!

सोनम कपूरने एक्स बॉयफ्रेंडलाही दिले लग्नाचे निमंत्रण; ब्रेकअपनंतर केले होते गंभीर आरोप!

googlenewsNext
्या कपूर परिवारात अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या ८ मे रोजी सोनम बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत साताजन्माच्या गाठी बांधणार आहेत. दरम्यान, सध्या कपूर परिवाराकडून या शाही विवाहात सहभागी होणाºया पाहुणे मंडळींची यादी तयार  केली जात आहे. त्यामध्ये अभिनेता रणबीर कपूरच्या नावाचाही समावेश आहे. जेव्हा सोनमने २००७ मध्ये आलेल्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती, तेव्हा तिचे नाव अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडले गेले होते. 

त्यावेळी दोघांच्या प्रेमाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र चित्रपट अपयशी झाल्यामुळे रणबीर आणि सोनमचे नातेही संपुष्टात आले. त्यानंतर एका मुलाखतीत सोनमने रणबीरबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले होते. सोनम करण जोहरच्या शोमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत पोहोचली होती. तेव्हा सोनमने म्हटले होते की, रणबीर बॉयफ्रेंड मटीरियल नाही. त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणे खूप अवघड आहे. यावेळी सोनमने रणबीर कपूरला मम्माज बॉय असेही म्हटले होते. सोनमच्या या वक्तव्यानंतर रणबीरने तिला ड्रामा क्वीन असे म्हटले होते. 



दरम्यान, एक काळ असाही होता जेव्हा सोनम, रणबीरचे कौतुक करताना अजिबातच थांबत नव्हती. तिने म्हटले होते की, रणबीर असा मुलगा आहे, ज्याला प्रत्येक मुलगी आपला बॉयफ्रेंड बनवू इच्छिते. दरम्यान, या वादानंतरही सोनमने रणबीरला तिच्या लग्नाचे निमंत्रण दिल्याची बातमी समोर येत आहे. रणबीर व्यतिरिक्त सोनम कपूरचे नाव दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा याच्याशीही जोडले गेले आहे. पुनीतने सोनमला ‘आय हेट लव स्टोरीज’ या चित्रपटात संधी दिली होती. मात्र दोघांनी कधीही त्यांच्यातील नात्याचा जाहीरपणे खुलासा केला नव्हता. 



दरम्यान, ८ मे रोजी होणाºया लग्नानंतर सायंकाळी ग्रॅण्ड रिसेप्शनची तयारी केली जात आहे. रात्री ८ वाजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा सोहळा मुंबई येथील द लीला या ठिकाणी पार पडणार आहे. रिसेप्शन पार्टीत येणाºया पाहुण्यांसाठी इंडियन आणि वेस्टनर्न फॉर्मल हा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Sonam Kapoor also invited the ex-boyfriend to the wedding; After the breakup, serious charges were made!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.