सोनम-आनंदच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 22:29 IST2018-05-08T16:59:23+5:302018-05-08T22:29:35+5:30

सोनम-आनंदच्या रिसेप्शन सोहळ्याला सुरुवात झाली असून, त्यास इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे.

Sonam-Anand's wedding reception celebrations celebrate, photo! | सोनम-आनंदच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा फोटो!

सोनम-आनंदच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा फोटो!

िनेत्री सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजाचे मुंबई येथे अतिशय शाही पद्धतीने लग्न पार पडले. दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करीत होते. आज रीतिरिवाजानुसार दोघांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. सोनमची मावशी कविता सिंग यांच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक बडे कलाकार यावेळी उपस्थित होते. दरम्यान सोनम आणि आनंदच्या लग्नाचे मुंबईत रिसेप्शन सुरू असून, त्यासही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. 
 

मुंबईतील द लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिशय ग्रॅण्ड असा रिसेप्शन सोहळा सुरू आहे. या सोहळ्यासाठी सध्या पाहुण्यांचे येणे सुरू असून, अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. अभिनेता इमरान खान याचा एक फोटो समोर आला असून, काळ्या रंगाच्या सूटमध्ये तो अतिशय कूल अंदाजात दिसत आहे. या सोहळ्यात तो पत्नी आणि मुलांसोबत उपस्थित आहे. 
 

त्याचबरोबर सोनमचे काका संजय कपूरही मुलासोबत याठिकाणी नुकतेच पोहोचले आहे. दोघाही बाप-लेकांनी काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये याठिकाणी हजेरी लावली आहे. त्यांचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले आहे. त्याचबरोबर रिसेप्शन सोहळ्यातील सोनम आणि तिचा पती आनंद यांचाही लूक समोर आला असून, हे नवदाम्पत्य त्यात खूपच सुंदर दिसत आहे. 
 

Web Title: Sonam-Anand's wedding reception celebrations celebrate, photo!