'हम साथ साथ हैं'मध्ये या अटीवर सोनाली बेंद्रेला केलं होतं कास्ट, सलमानची बनली होती नायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:16 IST2025-05-14T19:16:25+5:302025-05-14T19:16:42+5:30
Sonali Bendre : नव्वदच्या दशकातील अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अलीकडेच 'हम साथ साथ हैं' चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला.

'हम साथ साथ हैं'मध्ये या अटीवर सोनाली बेंद्रेला केलं होतं कास्ट, सलमानची बनली होती नायिका
नव्वदच्या दशकातील अभिनेत्री सोनाली बेंद्रे(Sonali Bendre)ने अलीकडेच 'हम साथ साथ हैं' (Hum Saath Saath Hai) चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला. तिने सांगितले की चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या (Suraj Badjatya) यांनी तिला कोणत्या परिस्थितीत कास्ट केले होते. ती सलमान खानच्या विरुद्ध 'डॉक्टर प्रीती'च्या भूमिकेत दिसली. 'हम साथ साथ हैं' १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये सैफ अली खान, सलमान खान, करिश्मा कपूर, मोहनीश बहल आणि तब्बू सारखे कलाकार होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर होता आणि आजही हा चित्रपट तितकाच आवडीने पाहिला जातो.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली बेंद्रेंने सांगितले की, ''खऱ्या आयुष्यात ती 'हम साथ साथ हैं' मधील प्रीतीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. प्रीती ही एक अशी व्यक्तिरेखा होती जी खूप शिक्षित आणि साधेपणाने परिपूर्ण होती. पण खऱ्या आयुष्यात सोनाक्षीचा ड्रेसिंग सेन्स प्रीतीपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. इतकेच नाही तर हेअरस्टाईलदेखील पूर्णपणे वेगळी असायची. तिने सांगितले की, कॅमेऱ्याबाहेर ती स्टडऐवजी सरळ केस, जाड अँकलेट, जीन्स, क्रॉप टॉप आणि नोज रिंग कशी घालायची.''
बडजात्यांसोबतच्या भेटीची अभिनेत्रीने सांगितली पहिली आठवण
सूरज बडजात्यासोबतच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना सोनाली बेंद्रे म्हणाली, ''त्या दिवशी मी पांढरा सलवार कुर्ता आणि चांदीचे कानातले घातले होते. मी नाकात रिंगही घातली होती. मला माहित होते की, ही साधेपणासह एक आधुनिक भूमिका आहे. तरीही, मला नॅचरल दिसणारे कपडे घालावे लागले. मला आठवते की, त्या कथेने मला कसे हादरवून टाकले. सूरज बडजात्याने नंतर पटकथा अतिशय सुरेख पद्धतीने सांगितली. जिथे प्रत्येक पात्राला महत्त्व होते.''
सोनाली बेंद्रेने प्रीतीला भारतीय कपडे घालण्याचा सल्ला दिला. सोनाली बेंद्रेने ही कथा ऐकली तेव्हा तिला वाटले की पाश्चात्य कपडे या पात्राला अजिबात बसणार नाहीत. महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीतून आलेली ही अभिनेत्री म्हणाली की, प्रीतीचे पात्र असे आहे की ती अजूनही अभ्यास करत आहे. ती बहुतेकदा घरीच दिसते, त्यामुळे पाश्चात्य कपडे घालण्यात काही अर्थ नाही. म्हणून तिला वाटले की प्रीती ही अशी मुलगी आहे की तिला भारतीय कपड्यांमध्ये दाखवणे जास्त चांगले वाटेल.
सूरज बडजात्याने ठेवली होती अट
दुसरीकडे, सूरज बडजात्या यांनी प्रीतीच्या भूमिकेसाठी पाश्चात्य लूकचा विचार केला होता. त्यांनी प्रीतीला पाश्चात्य पोशाखात एक सुशिक्षित आधुनिक मुलगी म्हणून दाखवण्याची कल्पना केली होती. परंतु सोनाली बेंद्रेच्या आग्रहावरून त्यांनी सलवार सूट घालण्यास सहमती दर्शविली. परंतु यानंतर, सूरज बडजात्या यांनी सोनालीसमोर एक अट ठेवली होती की ते तिला सलमान खानच्या विरुद्ध फक्त एका अटीवर कास्ट करेल. सोनाली बेंद्रे म्हणाली की, सूरज बडजात्या कपड्यांबाबत तिच्याशी सहमत होते. पण जर तिला ही भूमिका करायची असेल तर तिला नाकात रिंग घालावी लागेल, असे त्याने स्पष्टपणे सांगितले होते. हे ऐकून सोनालीनेही होकार दिला. म्हणूनच प्रेक्षकांनी पाहिले असेल की, हम साथ साथ चित्रपटात सोनालीने सूट सलवारसोबत नाकात रिंग घातलेली होती.