"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:08 IST2025-06-09T12:07:40+5:302025-06-09T12:08:12+5:30

सलमानचा राग करायची सोनाली बेंद्रे, पण कॅन्सर झाल्याचं समजताच भाईजानने गाठलं न्यूयॉर्क, म्हणाली...

sonali bendre talk about friendship with salman khan said he used to called my husband and asked about my health | "आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...

"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...

अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने एक काळ गाजवला. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं. 'हम साथ साथ है'मधील सोनाली बेंद्रे आणि सलमान खान यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण, सोनाली बेंद्रेला तेव्हा सलमान खानचा राग यायचा. त्यामुळे त्यांच्यात कधीच चांगली मैत्री होऊ शकली नाही. मात्र सोनालीला कॅन्सर झाल्याचं समजताच सलमानने न्यूयॉर्क गाठलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनालीने याबाबत सांगितलं. 

सोनालीने नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सलमान खानसोबतच्या फ्रेंडशिपवर भाष्य केलं. ती म्हणाली, "हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंगवेळी क्लोजअप सीन देताना कॅमेरामागून चिडवायचा. त्याचं हे वागणं मला अजिबात आवडायचं नाही. आमच्यात छोटी मोठी भांडणंही व्हायची. त्यामुळे आमच्यात कधीच चांगली मैत्री होऊ शकली नाही. पण, जेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं तेव्हा मला सलमानची दुसरी बाजू दिसली". 

"सलमान एका लहान बाळासारखा आहे. त्याला चिंता असते आणि तो काळजीदेखील घेतो. जी व्यक्ती कॅमेऱ्यामागे उभं राहून मला चिडवायची. तीच व्यक्ती मला कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर मी ठीक आहे की नाही हे विचारते. तो माझ्या नवऱ्याला फोन करून माझी विचारपूस करायचा. डॉक्टरांबद्दल विचारायचा, काही डॉक्टरही त्याने सजेस्ट केले होते. जेव्हा त्याला समजलं की आम्ही योग्य उपचार घेत आहोत. सगळं बरोबर सुरू आहे. तेव्हा त्याला धीर आला. यावरुनच समजतं की तो किती इमोशनल आणि केअरिंग आहे", असं सोनाली म्हणाली. एवढंच नाही तर कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असलेल्या सोनालीला भेटण्यासाठी दोन वेळा सलमान न्यूयॉर्कलाही गेला होता, असंही तिने सांगितलं

Web Title: sonali bendre talk about friendship with salman khan said he used to called my husband and asked about my health