सोनाली बेंद्रेने 'या' ठिकाणी केलं नववर्षाचं स्वागत, लेकासोबतचा फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:34 AM2024-01-01T11:34:57+5:302024-01-01T11:35:49+5:30

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोनाली बेंद्रे आध्यात्माकडे वळली आहे.

Sonali Bendre celebrated new year 2024 in haridwar shared photos with husband and son | सोनाली बेंद्रेने 'या' ठिकाणी केलं नववर्षाचं स्वागत, लेकासोबतचा फोटो होतोय व्हायरल

सोनाली बेंद्रेने 'या' ठिकाणी केलं नववर्षाचं स्वागत, लेकासोबतचा फोटो होतोय व्हायरल

नवीन वर्षाचं स्वागत सगळीकडेच धुमधडाक्यात केलं जात आहे. कोणी प्रवास करत तर कोणी प्रियजनांसोबत नवीन वर्षाची सुरुवात करत आहेत. बॉलिवूडकरही त्यांच्या पद्धतीने सेलिब्रेशन करत आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) मात्र कोणत्याही पार्ट्यांना न जाता थेट हरिद्वारला पोहोचली आहे. पती गोल्डी बहल आणि लेकासोबत तिने धार्मिक यात्रा करत 2024 चं स्वागत केलं आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोनाली बेंद्रे आध्यात्माकडे वळली आहे.  हरिद्वार येथे दर्शन, ई-रिक्षाची सफारी करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनालीने ही फॅमिली ट्रीप खूपच एन्जॉय केलेली दिसत आहे. पती गोल्डी बहल आणि मुलगा रणवीर बहलसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गंगा आरती, गंगा घाटावरील शांतता याची झलक तिच्या या पोस्टमधून दिसते.  सोनालीचा मुलगा रणवीर १८ वर्षांचा आहे. दोघांचा एकमेकांकडे बघत हसतानाचा फोटो तर खूपच सुरेख आलाय.

या फोटोंना कॅप्शन देत सोनालीने लिहिले,'ई रिक्षा, केबल कार राईड्स, हरिद्वारमधील सर्वात सुंदर दिवस सोबतच  गंगा आरतीचा सुरेख अनुभव. सोनालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. या वयातही तिचं सौंदर्य पाहून आजही तिच्यावर चाहते फिदा आहेत. 48 वर्षीय सोनालीसाठी मधला काळ कठीण होता जेव्हा तिने कॅन्सरचा सामना केला. तिला स्टेज 4 कॅन्सरचे निदान झाले होते. त्यातून तिने धीराने कमबॅक केले. आज ती पती आणि लेकासोबत आयुष्याचा आनंद घेत आहे.

Web Title: Sonali Bendre celebrated new year 2024 in haridwar shared photos with husband and son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.