- तरीही सोनाली बेंद्रेने मनापासून साजरी केली दिवाळी ...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 13:23 IST2018-11-08T13:22:47+5:302018-11-08T13:23:43+5:30

बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी दिवाळी साजरी केली. न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या सोनाली बेंद्रे हिनेही दिवाळी साजरी केली.

sonali bendre celebrated diwali with family view photos | - तरीही सोनाली बेंद्रेने मनापासून साजरी केली दिवाळी ...!!

- तरीही सोनाली बेंद्रेने मनापासून साजरी केली दिवाळी ...!!

बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी दिवाळी साजरी केली. न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या सोनाली बेंद्रे हिनेही दिवाळी साजरी केली. घरापासून दूर दिवाळी साजरी करणाऱ्या सोनालीने या दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत.
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोत सोनाली, तिचा पती गोल्डी बेहेल आणि मुलगा रणवीर असे तिघेही आहेत. ‘ इथे मुंबईपेक्षा खूप उशीरा दिवाळी साजरी होते म्हणून मी उशीरा दिवाळीच्या शुभेच्छा देतेय. यंदाची दिवाळी पारंपरिक पद्धतीने साजरी करता आली नाही. इथे भारतीय पारंपरिक कपडे माझ्याकडे नाही, त्यामुळे रोजचेच कपडे घातले. छोटीशी पूजा केली पण, तरीही जे काही केलं ते पूर्ण मनापासून केले,’ असे सोनालीने लिहिले आहे. शिवाय चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.




जुलै महिन्यात सोनालीला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत कॅन्सर या आजारावर उपचार घेत आहे. सोनालीची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. सोनाली न्यूयॉर्कला उपचारासाठी रवाना झाल्यापासून बॉलिवूडमधील तिच्या अनेक मित्रमैत्रिणी तिची भेट घेत आहे. नुकतेच बॉलिवूडची अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सोनालीची भेट घेतली. नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी आजही सोनाली आणि नम्रता यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे नम्रता आपल्या या लाडक्या मैत्रिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली होती.

Web Title: sonali bendre celebrated diwali with family view photos