सोनाली बेंद्रे, गोल्डी बेहल आणि प्रियांका चोप्राने घेतली ऋषी कपूर यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 11:35 IST2018-10-09T11:23:08+5:302018-10-09T11:35:22+5:30

ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. आता अनुपम यांच्यानंतर त्यांना भेटायला सोनाली बेंद्रे, पती गोल्डी बेहल आणि नणंद सृष्टी आर्या हे गेले होते.

Sonali Bendre and husband Goldie Behl, Priyanka chopra pay a visit to Rishi Kapoor | सोनाली बेंद्रे, गोल्डी बेहल आणि प्रियांका चोप्राने घेतली ऋषी कपूर यांची भेट

सोनाली बेंद्रे, गोल्डी बेहल आणि प्रियांका चोप्राने घेतली ऋषी कपूर यांची भेट

ऋषी कपूर सध्या आजारी असून उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीतू सिंग कपूर देखील गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्यासोबतच आहेत. खुद्द ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. मी उपचारासाठी अमेरिकेला जात आहे, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून सांगितले होते. त्यांना कुठला आजार झालाय, हे त्यांनी स्पष्ट केलेले नव्हते. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण या बातम्या चुकीच्या असून अद्याप तरी त्यांच्या केवळ टेस्ट सुरू आहेत असे त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते.

ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते दोघे खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. अनुपम खेर यांनी नुकतीच अमेरिकेत जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. त्यावेळेचा एक व्हिडिओ देखील ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला होता.



 

आता अनुपम यांच्यानंतर त्यांना भेटायला सोनाली बेंद्रे, पती गोल्डी बेहल आणि नणंद सृष्टी आर्या हे गेले होते. सोनाली कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरिकेतच आहे. त्यांच्या या भेटीचा फोटो नीतू सिंग कपूर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

तसेच प्रियांका चोप्राने देखील नुकतीच ऋषी कपूर यांची भेट घेतली. ऋषी कपूर, नीतू आणि प्रियांका यांचा फोटो प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर करत तुम्हाला नेहमीप्रमाणे आनंदित पाहून खूप आनंद झाला असे लिहिले आहे. 

 

ऋषी कपूर यांना काही दिवसांपूर्वी ट्वीट करत सांगितले होते की, ‘हॅलो, मी वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याने कामातून लहानशी सुट्टी घेतोय. माझ्या शुभचिंतकांना मी इतकीच विनंती करेल की, कुठलीही चिंता करू नका आणि तर्क काढू नका. मी ४५ पेक्षा अधिक वर्षांपासून सतत काम करतोय. तुमचे प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभार. मी लवकरच परत येईल..’ 



 


 

Web Title: Sonali Bendre and husband Goldie Behl, Priyanka chopra pay a visit to Rishi Kapoor