​‘फोर्स 3’ मध्ये सोनाक्षी असेल नायिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2016 09:14 PM2016-12-03T21:14:19+5:302016-12-03T21:14:19+5:30

बॉलिवूडचा हंक जॉन अब्राहम व दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘फोर्स - २’ हा चित्रपटाने बॉक्स ...

Sonakshi will be the heroine in 'Force 3'! | ​‘फोर्स 3’ मध्ये सोनाक्षी असेल नायिका!

​‘फोर्स 3’ मध्ये सोनाक्षी असेल नायिका!

googlenewsNext
ong>बॉलिवूडचा हंक जॉन अब्राहम व दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘फोर्स - २’ हा चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बºयापैकी कमाई केली आहे. जॉनने या चित्रपटाचा तिसरा भाग काढणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. अर्थातच यात जॉनची प्रमुख भूमिका असेल मात्र अभिनेत्री म्हणून कुणाची वर्णी लागेल याविषयी कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. नायिका कोण असेल याची माहिती खुद्द अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने दिली आहे. ‘फोर्स’च्या तिसºया भागात तिच नायिका असेल असे सोनाक्षीने सांगितले. 

‘फोर्स-२’ मध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन केलेल्या सोनाक्षीला आता फोर्सच्या पुढच्या सिक्वेलमध्ये भूमिका करायची आहे असे ती म्हणाली. एका कार्यक्रमात या विषयी तिला प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना सोनाक्षी म्हणाली, मी आधीच जॉन अब्राहम, सहनिर्माता विपुल शाह, आणि दिग्दर्शक अभिनय देव यांना सांगितले आहे की, ‘फोर्स-३’ माझ्या शिवाय बनणार नाही. सोनाक्षी म्हणाली, दोन अ‍ॅक्शन चित्रपटामुळे माझे वर्ष चांगले गेले आहे. जेव्हा तुम्ही साहसी भूमिका करता आणि तुमच्या कामाची प्रशंसा केली जाते, तेव्हा आनंद होतो. फोर्समध्ये मला जबरदस्त अ‍ॅक्शन करायला मिळाले, जॉन व अभिनव सोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे असेही ती म्हणाली. 

sonakshi sinha in force 3

सोनाक्षी सिन्हा हिची प्रमुख भूमिका असलेला आगामी ‘नूर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात ती एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. सोनाक्षी सिन्हाचा हा चित्रपट पूर्वी ७ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट २१ एप्रिलला रिलीज होणार आहे. ‘नूर’मध्ये सोनाक्षी पाकिस्तानात झालेल्या स्फोटांचे वार्तांकण करताना दिसणार आहे. या दरम्यान ती आपल्या जोडीदाराचा शोधही घेताना दिसेल. 

Web Title: Sonakshi will be the heroine in 'Force 3'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.