जहीरनं पत्नी सोनाक्षी सोबत केला मजेशीर प्रँक, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:40 IST2026-03-02T17:40:15+5:302026-03-02T17:40:44+5:30

एक मजेशीर प्रँक जहीरनं पुन्हा एकदा सोनाक्षीसोबत केलाय. 

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Holi Prank Video Viral | जहीरनं पत्नी सोनाक्षी सोबत केला मजेशीर प्रँक, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

जहीरनं पत्नी सोनाक्षी सोबत केला मजेशीर प्रँक, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)  ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. सोनाक्षी आणि तिचा पती जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचं दिसतं. ते आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना असतात. जहीर अनेकदा सोनाक्षीसोबत प्रँक करत असतो. नवरा बायकोचे हे कॉमेडी व्हिडीओ नेटकऱ्यांनाही आवडतात. जहीर सोनाक्षीची चेष्टा करत असतो, त्यावर सोनाक्षी त्याच्यावर चिडत असते. आता असाच एक मजेशीर प्रँक जहीरनं पुन्हा एकदा सोनाक्षीसोबत केलाय. 

सोनाक्षी आणि जहीर शूटिंग करत होते. यावेळी सोनाक्षी गांभीर्याने तिची स्क्रिप्ट वाचत असताना जहीरनं सोनाक्षीला एक हेल्मेट दिले. सोनाक्षी हेल्मेट डोक्यावर घातले. मात्र, त्या हेल्मेटमध्ये आधीच रंग भरलेला होता. जसे तिने हेल्मेट घातले, तसा तिचा संपूर्ण चेहरा आणि केस रंगाने माखले गेले. हे पाहून जहीर जोरात हसायला लागला आणि "बुरा न मानो होली है!" म्हणत तिथून स्कूटरवरून पळून गेला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सोनाक्षी रागाच्या भरात जहीरला मारण्यासाठी त्याच्या मागे धावताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं आहे. 


चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
रंगात न्हाऊन निघालेल्या सोनाक्षीची रिॲक्शन पाहून चाहतेही हसून हसून वेडे झाले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, "कोणीतरी जहीरला वाचवा!", तर दुसऱ्याने लिहिले, "सोनाक्षीची रिॲक्शन एकदम कडक होती". 

Web Title : ज़हीर ने पत्नी सोनाक्षी के साथ होली के रंग से प्रैंक किया; हंसी छूटी

Web Summary : ज़हीर इकबाल ने शूटिंग के दौरान सोनाक्षी सिन्हा के साथ रंग भरे हेलमेट से प्रैंक किया। सोनाक्षी, अपनी स्क्रिप्ट पढ़ते हुए, हेलमेट पहनती है, जिससे वह रंग से सराबोर हो जाती है। ज़हीर, "बुरा न मानो, होली है!" चिल्लाते हुए स्कूटर पर भाग गया, जिससे गुस्साई सोनाक्षी ने उसका पीछा किया। मजेदार वीडियो पर प्रशंसकों की मजेदार प्रतिक्रियाएं आईं।

Web Title : Zaheer Pranks Wife Sonakshi with Holi Colors; Hilarity Ensues

Web Summary : Zaheer Iqbal pranked Sonakshi Sinha with a color-filled helmet during shooting. Sonakshi, reading her script, donned the helmet, covering herself in color. Zaheer, shouting "Bura na mano, Holi hai!" fled on a scooter, prompting a chase from an angry Sonakshi. The funny video garnered amused reactions from fans.