सोनाक्षी सिन्हा पडली आजारी, केली कोरोनाची चाचणी; पती जहीरनं शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:30 IST2025-06-09T14:30:12+5:302025-06-09T14:30:37+5:30

सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आजारी आहे. तिने खबरदारी घेत तात्काळ कोरोनाची चाचणी केली.

Sonakshi Sinha Tests Negative For Covid After Catching Viral Fever Hubby Zaheer Posts Video | सोनाक्षी सिन्हा पडली आजारी, केली कोरोनाची चाचणी; पती जहीरनं शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

सोनाक्षी सिन्हा पडली आजारी, केली कोरोनाची चाचणी; पती जहीरनं शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. सोनाक्षी आणि जहीर  पुन्हा एकदा त्यांच्या गोंडस केमिस्ट्रीमुळे चर्चेत आले आहेत. दोघेही नेहमी त्यांच्या खासगी आयुष्याचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि यावेळीही असंच काहीसं पाहायला मिळालं.

सध्या सोनाक्षीची तब्येत बिघडली आहे. तब्येत बरी नसल्यामुळे तिने कोविड-१९ चाचणी देखील केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह (Sonakshi Sinha Tests Negative For Covid) आली आणि तिने स्वतः तिच्या इंस्टा स्टोरीवर याबाबत माहितीही दिली. यातच जहीरने इन्स्टाग्रामवर सोनाक्षीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी स्टीम घेताना दिसत आहे. यावर जहीर हा 'घुंघट में चंदा है...' हे गाणं मिश्कील पद्धतीने म्हणताना दिसतोय. त्यांच्या या गोड क्षणांनी चाहत्याचं मन जिंकून घेतलं आहे.

जहीरनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, "ही मुलगी व्हायरल झाली आहे". त्यानं हे वाक्य दुहेरी अर्थानं म्हटलं. एक म्हणजे व्हायरल ताप आणि दुसरा म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः व्हायरल झालाय. या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशीने हसणारे इमोजी कमेंट केले आहेत. अनेकांनी दोघांच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे.


जहीर आणि सोनाक्षी यांचा त्यांच्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे. नात्यात मैत्री असेल तर  एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता, या गोष्टीवर त्यांचं ठाम मत आहे. आता येत्या २३ जून रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असणार आहे. २३ जून २०२४ रोजी त्यांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं.  दरम्यान,  सोनाक्षीवर आंतरधर्मीय विवाह केल्याने बरीच टीकाही झाली.

Web Title: Sonakshi Sinha Tests Negative For Covid After Catching Viral Fever Hubby Zaheer Posts Video