Sonakshi Sinha & Zaheer Iqbal Wedding : ना हिंदू, ना मुस्लीम; सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांनी नोंदणी पद्धतीने केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:30 PM2024-06-23T20:30:07+5:302024-06-23T20:32:18+5:30

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या लाडक्या लेकीनं लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal got married on June 23, 2024 See Wedding And Photos Videos | Sonakshi Sinha & Zaheer Iqbal Wedding : ना हिंदू, ना मुस्लीम; सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांनी नोंदणी पद्धतीने केलं लग्न

Sonakshi Sinha & Zaheer Iqbal Wedding : ना हिंदू, ना मुस्लीम; सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांनी नोंदणी पद्धतीने केलं लग्न

sonakshi Sinha & Zaheer Iqbal Wedding :  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोनाक्षीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.  नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न केलं. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आले आहेत.  या फोटोत सोनाक्षी आणि झहीर हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिसून येत आहे.

सोनाक्षी आणि झहीर यांनी आपल्या कुटुंबाच्या उपस्थित नोंदणी पद्धतीने लग्न केलं.  सोनाक्षी हिनं इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या लाडक्या लेकीसाठी आनंदी असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोत सोनाक्षी आणि झहीर हे सही करताना पाहायला मिळताय.  सोनाक्षी आणि झहीरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. 

सोनाक्षी हिनं कॅप्शमध्ये लिहलं, 'आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (23.06.2017) एकमेकांच्या डोळ्यात आम्ही प्रेम पाहिलं आणि ते प्रेम जपण्याचा निर्णय घेतला.  त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं आणि या क्षणापर्यंत नेलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आता आम्ही पती आणि पत्नी झालो आहोत. प्रेम, आशा आणि एकमेंकासोबत सर्वगोष्टी सुंदर आहेत, आतापासून आम्ही  कायमचे साथी झालो आहोत, असे तिनं लिहलं'. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनाक्षीने लग्नासाठी ऑफ व्हाइट रंगाची साडी निवडली. या साडीत ती सुंदर दिसत होती. आपल्या साडीला फरफेक्ट मॅच होईल असा न्यूड मेकअप करणे तिनं पसंत केले आहे.   अतिशय मिनिमल मेकअपमध्ये देखील सोनाक्षी उठून दिसत आहे.  गळ्यात हार, कानात साजेसे असे कानातले असा साज घालून सोनाक्षीने आपला वेडिंग लूक पूर्ण केला आहे. झहीर यानेसुद्धा सोनाक्षीच्या कपड्यांना परफेक्ट मॅच होईल अशा कपड्यांची निवड केली आहे. अभिनेत्री सोबतच झहीरने परिधान केलेल्या कपड्यांचीदेखील तितकीच चर्चा आहे. 

सोनाक्षी आणि झहीर गेल्या 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.  दोघांनी कधीच आपलं नातं लपवलं नाही. दोघंही हातात हात घालून फिरताना दिसले आहेत. सोनाक्षीचा पती झहीर इक्बाल हा तिच्याहून एक वर्षाने लहान आहे. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं आहे. झहीरचे वडील इक्बाल रत्नासी ज्वेलरी व्यावसायिक आहेत. तसंच सलमानचे खानचे जुने मित्र आहेत. सलमान खाननेच झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. 2019 साली आलेल्या 'नोटबूक' सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला होता. सलमान खाननेच सोनाक्षी आणि झहीरची भेट घडवून आणली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. नंतर ते प्रेमात पडले होते. अखेर आज दोघांनी लग्न करत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title: Sonakshi Sinha and Zaheer Iqbal got married on June 23, 2024 See Wedding And Photos Videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.