जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:54 IST2025-10-16T09:53:56+5:302025-10-16T09:54:36+5:30
सोनाक्षी सिन्हाही गुडन्यूज देणार?

जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि पती जहीर इक्बाल यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात कोर्ट मॅरेज केलं. लग्नानंतर लगेचच सोनाक्षीच्या प्रेग्नसीच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. मात्र तिने वेळोवेळी याचं खंडन केलं होतं. दरम्यान काल एका दिवाळी पार्टीत सोनाक्षी सिन्हा भरजरी आऊटफिट घालून पोहोचली. यात ती बेबी बंप लपवत असल्याचा संशय नेटकऱ्यांना आला. इतकंच नाही तर पती जहीरने गंमतीत दोन वेळा सोनाक्षीच्या बेबी बंपवर हातही ठेवला. यावरुन सोनाक्षी त्याला चिडून मारत होती. त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जहीर इकबाल अनेकदा सोनाक्षीसोबत प्रँक करत असतो. नवरा बायकोचे हे कॉमेडी व्हिडिओ नेटकऱ्यांनाही आवडतात. जहीर सोनाक्षीची चेष्टा करत असतो त्यावर सोनाक्षी त्याच्यावर चिडत असते. कालच मुंबईत आयोजित दिवाळी पार्टीत सोनाक्षी आणि जहीर पोहोचले. ऑफ व्हाईट रंगाच्या अनारकली सूटमध्ये सोनाक्षी सुंदर दिसत आहे. लांब इयररिंग्स, हेअरबन असा तिचा लूक आहे. तर जहीरने निळ्या रंगाचा पठाणी सूट घातला आहे. सोनाक्षी आणि जहीर पापाराझींसमोर पोज देत असतात. तेवढ्यात जहीर सोनाक्षीच्या बेबी बंपवर हात ठेवतो. सोनाक्षी हसते आणि जहीरचा हात काढून त्याला मारते. सगळ्यांमध्ये एकच हशा पिकतो.
या व्हिडिओवरुन चाहतेही संभ्रमात पडले आहेत. सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या चर्चा व्हायच्या आधीच जहीरने असा प्रँक करत चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. दोघांच्या लग्नाला एक वर्ष उलटून गेलं आहे. तरी त्यांचा मजेशीर अंदाज आहे तसाच आहे.
दुसरीकडे बीटाऊनमध्ये अनेक आघाडीच्या अभिनेत्री आई झाल्या. गेल्यावर्षी दीपिका पादुकोणने लेकीला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी कियारा अडवाणीलाही गोंडस मुलगी झाली. तर आता कतरिना कैफही या महिन्यात पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. तसंच राजकुमार रावची पत्नी अभिनेत्री पत्रलेखाही प्रेग्नंट आहे. या सगळ्यात सोनाक्षीचाही नंबर लागतो का अशी चर्चा आहे.