सोना म्हणते,‘ आमिरला विसरा ; पाहा फातिमा, सन्याचा अभिनय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 18:57 IST2016-12-24T18:53:26+5:302016-12-24T18:57:45+5:30

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हिला आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट प्रचंड आवडलेला दिसतोय, हे आम्ही नाही तर खुद्द तिने ...

Sona says, 'Forget Aamirla; Look at Fatima, | सोना म्हणते,‘ आमिरला विसरा ; पाहा फातिमा, सन्याचा अभिनय’

सोना म्हणते,‘ आमिरला विसरा ; पाहा फातिमा, सन्याचा अभिनय’

लिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हिला आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट प्रचंड आवडलेला दिसतोय, हे आम्ही नाही तर खुद्द तिने केलेल्या वक्तव्यावरून वाटतेय. ती म्हणते,‘दंगल पाहताना आमिर खानला विसरा आणि फातिमा, सन्या यांचा अभिनय पाहा. तुम्हाला जाणवेल की, चित्रपटाचा खरा हिरो हा आमिर नसून फातिमा, सन्या या आहेत.’ ‘दंगल’ ने पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर केलेली कमाई पाहता थिएटरवरही दंगल सुरू झाल्याचे चित्र आहे. 
 ‘दंगल’ चित्रपटाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. आमिरसह फातिमा, सन्या यांच्याही अभिनयाला कौतुकाची थाप मिळत आहे. पण, तुम्हाला माहितीये का? सोनाक्षीला आमिरपेक्षा फातिमा, सन्या यांच्याच भूमिका जास्त आवडल्या. चित्रपटाची संपूर्ण टीम ही फातिमा सना शेख आणि सन्या मल्होत्रा यांच्याच कामाचे कौतुक करताना दिसतेय. त्या दोघींमधील उत्तम केमिस्ट्री ही चित्रपटाचे विशेष मानले जात आहे. महिला सक्षमीकरणाची जी संकल्पना त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून मांडली आहे, याचे सोनाक्षीने समर्थन केले आहे. 
 ‘दंगल’ ला शुभेच्छा, कौतुक, पाठिंबा मिळत असताना सोनाक्षीने टिवटरवर चित्रपटाच्या समर्थनार्थ अनेक ट्विटस केले आहेत. ज्यात गीता आणि बबिता यांच्या भूमिका साकारलेल्या फातिमा आणि सन्या यांच्या अभिनयाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. आमिर खान तर कसलेली भूमिका करणारा कलाकार असून, या दोघी तर दंगलमधून बॉलिवूडमध्ये त्यांचा डेब्यू करत आहेत. 
 

Web Title: Sona says, 'Forget Aamirla; Look at Fatima,