सोलापूरची दीप्ती धोत्रेचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 22:54 IST2016-03-31T05:54:57+5:302016-03-30T22:54:57+5:30
सोलापूरची दीप्ती धोत्रे ह्या तरूणीचे नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले आहे. दीप्तीचा नुकताच ‘धारा ३०२’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला असून ...

सोलापूरची दीप्ती धोत्रेचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
स लापूरची दीप्ती धोत्रे ह्या तरूणीचे नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले आहे. दीप्तीचा नुकताच ‘धारा ३०२’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला असून तिला आधीपासूनच अभिनयाचं वेड होतं. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाल्याने तिला खूप आनंद झाला आहे. तिचे आणखी दोन मराठी चित्रपट लवकरच येणार असल्याचे दीप्तीने म्हटले आहे. दीप्ती ही हिराचंद नेमचंद कॉलेजची विद्यार्थीनी आहे. दीप्तीने सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात असिस्टंट एडिटर म्हणून काम पाहिले आहे.