या अभिनेत्रीच्या ‘नो मेकअप लूक’वर चाहते झालेत फिदा! ‘अनऑफिशियल गुलजार’ही खल्लास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 12:35 IST2019-08-20T12:33:43+5:302019-08-20T12:35:21+5:30

बॉलिवूडमधील सर्वाधिक स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये या अभिनेत्रीचे नाव हमखास दिसणार. रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, हॉलिडे लूक असो किंवा प्रमोशनल लूक... तिचे सर्वच लूक चाहत्यांना घायाळ करतात.

social media users comment on kareena kapoor khan no make up instagram photo | या अभिनेत्रीच्या ‘नो मेकअप लूक’वर चाहते झालेत फिदा! ‘अनऑफिशियल गुलजार’ही खल्लास!!

या अभिनेत्रीच्या ‘नो मेकअप लूक’वर चाहते झालेत फिदा! ‘अनऑफिशियल गुलजार’ही खल्लास!!

ठळक मुद्देकरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमात बिझी आहे.

बॉलिवूडमधील सर्वाधिक स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिना कपूरचे नाव हमखास दिसणार.  करिनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, हॉलिडे लूक असो किंवा प्रमोशनल लूक... करिनाचे सर्वच लूक चाहत्यांना घायाळ करतात. त्यामुळेच सोशल मीडियावर सतत तिचे फोटो व्हायरल होतात. सध्या करिनाचा एक असाच फोटो व्हायरल होतोय. या फोटोत करिना ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसतेय.

इन्स्टाग्रामवर ‘द रिअल करिना कपूर’ नावाच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. करिना यात नो मेकअप लूकमध्ये आहे. तिच्या बोटात अंगठी आहे आणि नखांवर काळी नेलपॉलिश लावलेली आहे. तूर्तास या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहे. पण ‘अनऑफिशियल’ या अकाऊंटवरून करण्यात आलेली कमेंट सर्वात खास आहे.

होय, ‘ये बद-दुआएं अपने पास ही रखो... मुझे मोहब्बत हुई है, मैं खुद ही मर जाऊंगा,’ असे या कमेंटमध्ये लिहिलेले आहे. काहींना करिनाचा हा ‘नो मेकअप लूक’ आवडला आहे तर काहींनी हा लूक भयंकर असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला करिनाचा हा लूक कसा वाटला ते सांगायला विसरू नका.


करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमात बिझी आहे. हा चित्रपट ‘हिंदी मीडियम’चा सीक्वल आहे. यात इरफान खान तिच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय सध्या करिना ‘डान्स इंडिया डान्स’ हा रिअ‍ॅलिटी डान्स शो जज करते आहे. लवकरच अक्षय कुमार व करिनाचा ‘गुड न्यूज’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: social media users comment on kareena kapoor khan no make up instagram photo