​ - तर काय माहिरा खानचे रणबीर कपूरसोबत झाले ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 14:33 IST2018-01-04T09:03:45+5:302018-01-04T14:33:45+5:30

शाहरूख खानसोबत ‘रईस’मध्ये दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळी तिच्याबद्दलची बातमी रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपसंदर्भात ...

- So what happened with Mahirah Khan Ranbir Kapoor? | ​ - तर काय माहिरा खानचे रणबीर कपूरसोबत झाले ब्रेकअप?

​ - तर काय माहिरा खानचे रणबीर कपूरसोबत झाले ब्रेकअप?

हरूख खानसोबत ‘रईस’मध्ये दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळी तिच्याबद्दलची बातमी रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपसंदर्भात नाही तर ब्रेकअपसंदर्भात आहे. होय, मध्यंतरी माहिरा व रणबीरचे एकत्र स्मोकिंग करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंनी खळबळ उडवून दिली होती. या फोटोनंतर रणबीर व माहिरा दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता या दोघांच्या ब्रेकअपचे संकेत मिळत आहेत. खुद्द माहिराने ताज्या मुलाखतीत याबाबतचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. सध्या तू कुणाच्या प्रेमात आहेस का? असा प्रश्न अलीकडे माहिराला विचारला गेला. यावर माहिराने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. नाही, मी आधी प्रेमात होते. पण आता नाही.   मला विचाराल तर प्रेम हीच शांती आहे. जेव्हा तुम्ही कुणासोबत असता तेव्हा तुम्हाला शब्दांची गरज भासत नाही. त्या व्यक्तिचे असणेच पुरेसे असते, असे माहिरा म्हणाली. माहिराने स्वत:च्या लव्ह लाईफबद्दल दिलेली ही कबुली बघता, तिचे व रणबीरचे ब्रेकअप झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात खरे काय, ते माहिरा अन् रणबीरलाच ठाऊक.



रणबीर व माहिराचे काही इंटिमेट फोटो व्हायरल झाल्यानंतर   दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा भलतीच रंगली होती. या  फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही कॅमेºयाने टिपले होते.   हे फोटो आणि माहिराच्या पाठीवरचे हे ‘लव्ह बाईट्स’ यानंतर जितका काय तो बोभाटाही झाला होता. पाकिस्तानी जनतेने तर माहिराला जाम फैलावर घेतले होते.

ALSO READ : रणबीर कपूरसोबतच्या त्या फोटोंवर पुन्हा बोलली माहिरा खान! वाचा काय म्हणाली!!

‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटल्या होत्या. ट्रोलर्स  माहिराला असे आडव्या हातांना घेत असलेले पाहून रणबीरने या संपूर्ण प्रकरणावर खुलासाही केला होता.  मी गेल्या काही काळापासून  माहिराला ओळखतो. मी तिचा खूप आदर करतो. त्यामुळे तिला ज्या पद्धतीने जज केले जात आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे, असे रणबीरने   एका मुलाखतीत म्हटले होते.  

Web Title: - So what happened with Mahirah Khan Ranbir Kapoor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.