...म्हणून सारा तेंडुलकरवर खिळल्या सर्वांच्या नजरा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 18:20 IST2017-05-25T12:50:22+5:302017-05-25T18:20:22+5:30
सचिनचा बायोपिक ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या प्रिमियमसाठी बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मोठमोठ्या दिग्गजांची उपस्थिती होती. मुंबईतल्या ...
.jpg)
...म्हणून सारा तेंडुलकरवर खिळल्या सर्वांच्या नजरा !
स िनचा बायोपिक ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या प्रिमियमसाठी बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मोठमोठ्या दिग्गजांची उपस्थिती होती. मुंबईतल्या वर्साेवा मधल्या पीव्हीआर इथे हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सचिनसह त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा आणि मुलगा अर्जून यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी सगळ्यांच्या नजरा सचिनची मुलगी सारावर खिळून होत्या. साराने यावेळी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ती या ड्रेसमध्ये खूपच उठून दिसत होती.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाली. त्यासाठीच भारतीय संघाकरता सचिननं आपल्या चित्रपटाच्या खास शोचं आयोजन केलं होतं. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडुंसह कर्णधार विराट कोहलीची खास मैत्रीण अभिनेत्री अनुष्का शर्माही या खास शोला हजर होती. शिवाय या खास स्क्रीनिंगसाठी एम एस धोनी, युवराज सिंह यांच्यासोबतच अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, केदार जाधव, शिखर धवन, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार हे देखील उपस्थित होते.
तर सचिनला क्रिकेटचे धडे देणारे त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांना सुद्धा या विशेष खेळासाठी सचिननं विशेष आमंत्रित केलं होतं. बॉलिवूडमधून शाहरुख खान, आमिर खान आणि बच्चन कुटुंबियांसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित राहिले.
या सर्वांच्या उपस्थित मात्र साराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Also Read : OMG : सचिन तेंडुलकरचा चित्रपट पाहून अमिताभ बच्चन बोलले असे काही..!