म्हणून पाकिस्तानी माहिराची'रईस'मध्ये ठेवण्यात आली भूमिका?कसे झाले माहिरा शाहरूख इंटिमेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:56 IST2016-12-07T12:48:04+5:302016-12-07T17:56:33+5:30

त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘रईस’ चा ट्रेलर केव्हा लाँच होणार याच्या प्रतीक्षेत असतांनाच ट्रेलर लाँच करण्यात आला. क्षणार्धात ट्रेलरला लाखो लाईक्स मिळाले. शाहरूख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांची आगळीवेगळी जोडी हे या चित्रपटाचे विशेष आकर्षणच ठरले.

So how did the Pakistani Mahirachi play the role of 'Raisin'? How did Mahira Shahrukh intimate? | म्हणून पाकिस्तानी माहिराची'रईस'मध्ये ठेवण्यात आली भूमिका?कसे झाले माहिरा शाहरूख इंटिमेट?

म्हणून पाकिस्तानी माहिराची'रईस'मध्ये ठेवण्यात आली भूमिका?कसे झाले माहिरा शाहरूख इंटिमेट?

लिवूडच्या किंग खानचा चित्रपट नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी अगदी स्पेशल असतो. चाहते अत्यंत उत्सुकतेने त्याच्या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. आता हेच पाहा ना! त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘रईस’ चा ट्रेलर लाँच करण्यात आला. क्षणार्धात ट्रेलरला लाखो लाईक्स मिळाले. शाहरूख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांची आगळीवेगळी जोडी हे या चित्रपटाचे विशेष आकर्षणच ठरले.शाहरूख खानचा चित्रपट आणि त्यात अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स नाही असे शक्य आहे का? नाही ना. ‘रईस’ मध्ये भरपूर अ‍ॅक्शन, डायलॉगबाजी आणि शाहरुखचा वनमॅन शो पाहायला मिळतोय. चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे यात एक आयटम नंबरसुद्धा पहावयास मिळणार आहे. ठाऊक आहे का, सनी लिओनीचा डान्स नंबर ही खास चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

                                       

शाहरूख खानच्या आवाजाचे त्याचे चाहते अक्षरश: दिवाने आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला त्याचा आवाज बॅकग्राऊंडला वापरण्यात आला आहे. ८० च्या दशकातील दारू माफिया रईस आलमची भूमिका शाहरूख साकारतो आहे. तो दारू माफिया कसा बनला, त्याच्या आयुष्यात माहिरा खानची एन्ट्री, पोलिस अधिकारी गुलाम पटेल (नवाजुद्दीन सिद्दीकी) याच्यासोबत होणाऱ्या  त्याच्या चकमकी या बाबी चित्रपटाचा टीआरपी वाढवणार आहे.गुलाम पटेल रईसचे साम्राज्य उधळण्याच्या प्रयत्नात असतो. पण, शेवटी शाहरूख हा रईस असतो. तो जिंकल्याशिवाय राहणार नाही. चित्रपटाचे आणखी एक विशेष म्हणजे त्यातील डायलॉगबाजी. ‘आम्मीजान कहती थी, कोई धंदा छोटा नही होता, और धंदेसे बडा कोई धरम नही होता’ या धमाकेदार डायलॉगने चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात होते. ‘बनिये का  दिमाग और मियाँभाई की डेअरिंग’ असे एकापेक्षा एक सरस डायलॉग यात त्याने म्हटले आहेत. 

cnxoldfiles/a> आता ट्रेलर तर लाँच झाला, पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर काय होईल, ते आता वेळच सांगेल.

Web Title: So how did the Pakistani Mahirachi play the role of 'Raisin'? How did Mahira Shahrukh intimate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.