शिल्पा शेट्टीला झाला राग अनावर, मेकअप आर्टीस्टलाच लगावली कानशिलात, व्हिडीओ Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 14:50 IST2021-03-13T14:48:06+5:302021-03-13T14:50:05+5:30

Shilpa Shetty gave "Laafa" to her makeup Man: शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मेकअप आर्टीस्टलाचा कानशिलात लगावत असल्याचे दिसतंय.

Slapping Makeup artist, Shilpa Shetty's video getting viral | शिल्पा शेट्टीला झाला राग अनावर, मेकअप आर्टीस्टलाच लगावली कानशिलात, व्हिडीओ Viral

शिल्पा शेट्टीला झाला राग अनावर, मेकअप आर्टीस्टलाच लगावली कानशिलात, व्हिडीओ Viral

बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्विन अशी ओळख असलेली शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियावरून ती फिटनेस आणि योगाचे व्हिडिओ, फोटोच नेहमी शेअर करते. सिनेमापासून ती लांब असली तरी रिएलिटी शोमधून जजच्या भूमिकेत ती झळकत असते. शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मेकअप आर्टीस्टलाचा कानशिलात लगावत असल्याचे दिसतंय. अर्थात हा कॉमेडी व्हिडीओ आहे. असे अनेक व्हिडीओ शिल्पाचे व्हायरल होत असातात.

सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. याआधीही शिल्पाचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

बॉलिवूड थ्रिलर ‘बाजीगर’ सिनेमातून शिल्पाने 1993 मध्ये सिनेविश्वात पाऊल ठेवलं होतं. अभिनयाच्या जोरावर आणि सौंदर्यांने चाहत्यांची तुफान पसंती मिळवली होती. तिच्या प्रत्येक भूमिकेला रसिकांनी पसंती दिली होती.  त्यानंतर 'मै खिलाडी तू अनाडी', 'गॅम्बलर', 'औझार', 'धडकन' असे एकापेक्षा एक हिट सिनेमे तिने दिले.  ‘मै आई हू यूपी बिहार लूटने’ या गाण्यातील अदांनी शिल्पाने अनेकांना घायाळ केलं. आजही शिल्पाला पाहताच चाहत्यांना या गाण्याची आठवण नाही झाली तर नवल.

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’नंतर शिल्पा बॉलिवूड सिनेमा दिसली नाही. तरीही शिल्पाचे फिटनेस व्हिडीओ आणि रॅम्पवॉक लक्ष वेधून घेतात. या वर्षी ‘निकम्मा’ सिनेमातून तब्बल 13 वर्षांनी शिल्पा पुनरागमन करणार आहे. त्यामुळे रुपेरी पडद्यावर शिल्पाला पाहण्यासाठी तिचे चाहते चांगेल उत्सुक आहेत.

Web Title: Slapping Makeup artist, Shilpa Shetty's video getting viral