रोहित शेट्टीने शेअर केला 'सिंघम अगेन'च्या सेटवरील धमाकेदार व्हिडीओ, म्हणाला- 'तुम्ही पतंग उडवा आणि मी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 02:45 PM2024-01-15T14:45:39+5:302024-01-15T14:47:37+5:30

'सिंघम अगेन'च्या शूटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Singham Again: Rohit Shetty Shares An Explosive BTS From The Film Set, Video Goes Viral | रोहित शेट्टीने शेअर केला 'सिंघम अगेन'च्या सेटवरील धमाकेदार व्हिडीओ, म्हणाला- 'तुम्ही पतंग उडवा आणि मी...'

रोहित शेट्टीने शेअर केला 'सिंघम अगेन'च्या सेटवरील धमाकेदार व्हिडीओ

चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय दिग्दर्शक, रोहित शेट्टी त्याच्या जबरदस्त अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोहित शेट्टीचा सिनेमा म्हटल्यावर, जबरदस्त कार स्टंट आलेच. महागड्या अलिशान गाड्या हवेत उडतात, एकमेकांवर आदळतात असे सीन्स रोहितच्या सिनेमात दिसणारच. कार स्टंट नसतील तर त्याला रोहित शेट्टीचा सिनेमा म्हणताच येणार नाही. हीच खास गोष्ट आहे, जी त्याला इतर निर्मात्यांपेक्षा वेगळी बनवते. असाच एक खास धमाकेदार व्हिडीओ रोहित शेट्टीने मकर संक्रांतीच्या दिवशी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

सध्या रोहित शेट्टी हा अजय देवगण स्टारर  'सिंघम अगेन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्याच्या 'सिंघम 3' चित्रपटाच्या शूटिंगची झलक दाखवून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक जळणारी कार हवेत उडताना दिसत आहे. 'सिंघम अगेन'च्या शूटिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 या व्हिडीओपेक्षाही कॅप्शन युजर्समध्ये चर्चेचा विषय बनलं आहे. रोहित शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहलं, 'मकर संक्रांतीच्या शुभेच्छा... तुम्ही लोक पतंग उडवा आणि मी... माझे काम मला  आवडते... अॅक्शन... नाईट शूट... हैदराबाद'. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. पॉवर पॅक्ड स्टंटची झलक शेअर करून रोहित शेट्टीने चाहत्यांनी उत्कंठा वाढवली आहे. 

रोहित शेट्टीच्या या कॉप युनिव्हर्समध्ये रणवीर सिंहचा 'सिंबा' आणि अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आहे. तसंच यावेळी टायगर श्रॉफही त्यांच्यात सामील होणार आहे. तर करिना कपूर खानही सिनेमाचा भाग आहे. शिवाय दीपिका पदुकोण 'लेडी सिंघम' म्हणून समोर येणार आहे. रोहित शेट्टी स्टाईलमध्य ही तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. अजय देवगणने नेहमीच त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता सिंघम 3 ची चाहत्यांमध्ये उत्सुकता ताणली आहे.

Web Title: Singham Again: Rohit Shetty Shares An Explosive BTS From The Film Set, Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.