ईशा गुप्ताला ‘रफ्तार’ची साथ! ट्रोलरला दिले सणसणीत उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 11:39 IST2019-06-03T11:38:08+5:302019-06-03T11:39:02+5:30

इंटरनेटचे जग बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसाठी सध्या डोकेदुखी ठरू पाहत आहेत. स्टार्स आपल्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडीओ शेअर करतात. पण अनेकदा काही लोक यावरून स्टार्सला ट्रोल करणे सुरु करतात. सध्या ट्रोल होतेय ती बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री ईशा गुप्ता.

singer raftaar trolled the troller who said esha gupta kapde nahi hain kya baby tumhare paas | ईशा गुप्ताला ‘रफ्तार’ची साथ! ट्रोलरला दिले सणसणीत उत्तर!!

ईशा गुप्ताला ‘रफ्तार’ची साथ! ट्रोलरला दिले सणसणीत उत्तर!!

ठळक मुद्देईशा गुप्ता सर्रास आपल्या सोशल अकाऊंटवर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून अनेकदा ईशा ट्रोलही झाली. पण ईशाने कधीच या ट्रोलर्सची पर्वा केली नाही.

इंटरनेटचे जग बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसाठी सध्या डोकेदुखी ठरू पाहत आहेत. स्टार्स आपल्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडीओ शेअर करतात. पण अनेकदा काही लोक यावरून स्टार्सला ट्रोल करणे सुरु करतात. सध्या ट्रोल होतेय ती बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री ईशा गुप्ता.
होय, ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक बोल्ड फोटो शेअर केला. या फोटोत ईशा नेहमीप्रमाणे कमालीची सुंदर दिसतेय. ईशाने हा फोटो पोस्ट केला आणि चाहत्यांच्या कमेंट सुरु झाल्यात. पण काही लोकांनी या फोटोवरून ईशाला ट्रोल करणे सुरु केले.

‘कपडे नहीं है क्या बेबी तुम्हारे पास पहनने को,’असे हा फोटो पाहून एका युजरने लिहिले. ट्रोलरच्या या प्रश्नावर ईशा तशी रिअ‍ॅक्ट झाली नाही. पण ईशाच्या बाजुने लोकप्रिय रॅपर रफ्तार मैदानात उतरला. त्याने या ट्रोलरला सणसणीत उत्तर दिले.

‘दंत मंजन नहीं है क्या तुम्हारे पास, जुबान साफ रखा करो,’ असे रफ्तारने लिहिले. रफ्तारच्या या उत्तराने व्हायचे ते झाले. ईशाला ट्रोल करणारा तो युजर गप्प झाला.


ईशा गुप्ता सर्रास आपल्या सोशल अकाऊंटवर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून अनेकदा ईशा ट्रोलही झाली. पण ईशाने कधीच या ट्रोलर्सची पर्वा केली नाही. आता तर रफ्तारसारखा मोठा स्टार्स तिच्या बाजूने उभा ठाकला आहे. त्याच्यासारख्यांमुळे ट्रोलर्सची तोंड काही काळासाठी तरी बंद होतील, अशी अपेक्षा करूयात.


अलीकडे ईशा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती. हार्दिक पंड्यासोबत तिचे नाव जोडले जात होते. पण कालांतराने हार्दिक व तिच्यात तसले काहीही नसल्याचे स्पष्ट झाले होते.

Web Title: singer raftaar trolled the troller who said esha gupta kapde nahi hain kya baby tumhare paas