या फोटोंनी गायिका नेहा भसीनने भल्या भल्यांची उडवली झोप, एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 14:54 IST2020-01-08T14:48:34+5:302020-01-08T14:54:15+5:30
''ये है जलवा'' म्हणत नेहा भसीन सोशल मीडियावर आग लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

या फोटोंनी गायिका नेहा भसीनने भल्या भल्यांची उडवली झोप, एकदा पाहाच
'सुल्तान' सिनेमातील 'जग घुमियाँ' या गाण्यामधून रसिकांची लाडकी बनलेली गायिका म्हणजे नेहा भसीन. सूरांच्या जादूमुळे बॉलीवुडमधील एक प्रसिद्ध आणि चर्चित गायिकांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. आपल्या सूरांनी तिनं रसिकांना अक्षरक्षः वेड लावले होते. आता पुन्हा एकदा नेहा भसीनची चर्चा सुरु आहे. ''ये है जलवा'' म्हणत नेहा भसीन सोशल मीडियावर आग लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. कधी कलरफुल तर कधी पिवळ्या तर कधी गुलाबी अशा रंगातील बिकनी घालत ती सा-यांना क्लिन बोल्ड करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे तिचाही बोलबाला पाहायला मिळतो, तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेहाचे हे फोटो काहीसे वेगळे ठरतात. आपल्या गायकीप्रमाणेच ती स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असते. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.