बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकेला जायचे होते भारतीय सैन्य दलात, तिनेच केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 19:26 IST2020-04-28T19:17:23+5:302020-04-28T19:26:03+5:30

काही महिन्यांपूर्वी एक शोमध्ये तिने हा खुलासा केला होता.

Singer Neeti Mohan wanted to join the indian army gda | बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकेला जायचे होते भारतीय सैन्य दलात, तिनेच केला हा खुलासा

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकेला जायचे होते भारतीय सैन्य दलात, तिनेच केला हा खुलासा

गायिका नीति मोहन गेल्या वर्षी बॉयफ्रेंड निहार पांड्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. नीतीला सैन्यात जायची इच्छा होती असा खुलासा नीतिने काही महिन्यांपूर्वी एक शोमध्ये केला होता.  


नीति म्हणाली, ''मला पहिल्यापासून भारतीय सैन्यात जायची आणि अधिकारी बनण्याची इच्छा होती. पण मला वाटते संगीत क्षेत्रात येणेच माझ्या नशिबात होते. शाळेत आणि कॉलेजात असताना मी NCC मध्ये असायचे आणि मला C सर्टिफिकेट देखील मिळवले होते. मी एका प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देखील सामील होते आणि काही प्रसंगी बँड लीडर देखील होते, जे खूप लोकांचे स्वप्न असते. पण गोष्टी बदलल्या आणि आता मी गायिका झाले. पण माझी मनापासून अशी इच्छा आहे की माझा आवाज सीमेवरील सैंनिकांपर्यंत पोहोचावा.''


नीतिबद्दल सांगायचे तर ती बॉलिवूडची एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टीटू की स्वीटी अशा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गायले आहे. तिने हिंदीसोबतच तामिळ आणि तेलुगू भाषेत देखील पार्श्वगायन केले आहे.   ए आर रेहमान आणि गुलजार यांच्यासारख्या दिग्गजांसोबत तिने काम केले आहे. 

Web Title: Singer Neeti Mohan wanted to join the indian army gda