'मला उर्फी प्रचंड आवडते, ती बोल्ड अन्...'; हनी सिंगने उर्फी जावेदबाबत केलेल्या विधानाची चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:31 PM2023-01-06T13:31:44+5:302023-01-06T13:32:04+5:30

गायक हनी सिंग यांनी उर्फी जावेदचं कौतुक केलं आहे.

Singer Honey Singh has praised Urfi Javed. | 'मला उर्फी प्रचंड आवडते, ती बोल्ड अन्...'; हनी सिंगने उर्फी जावेदबाबत केलेल्या विधानाची चर्चा  

'मला उर्फी प्रचंड आवडते, ती बोल्ड अन्...'; हनी सिंगने उर्फी जावेदबाबत केलेल्या विधानाची चर्चा  

googlenewsNext

उर्फी जावेदची (Urfi Javed) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. 

उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलवरुन सध्या भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान गायक हनी सिंग यांनी उर्फी जावेदचं कौतुक केलं आहे. मला उर्फी प्रचंड आवडते. ती बोल्ड आणि धाडसी आहे. स्वत:च्या अटींवर जगते. देशातील सगळ्या मुलींनी तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं, असं गायक हनी सिंगने म्हटलं आहे. 

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच उर्फीने देखील चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं, सोयीचं आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो अनेक मुद्दे आहेत. जसं बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं, खून. या प्रकरणांचे काय?, असं उर्फीने चित्रा वाघ यांना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. 

उर्फीच्या या उत्तरावर चित्रा वाघ यांनी देखील पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. तिने ज्या भाषेत ट्वीट केलंय ते सांगतानाही मला लाज वाटते आहे. मी स्वतः पोलिसांत केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. आज ट्वीट केलंय तिने, पण उद्या मला जर कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन आणि मग ट्वीट करेन. काय व्हायचं असेल ते होऊद्या, पण आम्ही महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. सगळ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो म्हणून कुणीही नाममात्र कपडे घालून रस्त्यावर फिरायचं. असले चाळे आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. 

दरम्यान, उर्फीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच ती big boss बिग बॉस मध्येही होती. तिथुन तिला प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस मध्ये ती केवळ एक आठवडा राहू शकली मात्र तिथेही तिच्या फॅशन सेन्स ने सर्वांना हैराण केले होते. सध्या उर्फी splitsvilla 14 'स्प्लिट्सव्हिला १४' शो मध्ये दिसून येत आहे ज्यामुळे हा शो सुद्धा चर्चेत आहे.

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, 'ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. २०१५मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Web Title: Singer Honey Singh has praised Urfi Javed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.