​ चाहत्याने ‘या’ गायिकेला फोन करून बोलवले भेटायला! नकार दिल्यावर केला असा कारनामा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 10:58 AM2018-06-08T10:58:41+5:302018-06-08T16:31:42+5:30

‘प्रेम रतन धन पायो’,‘कौन तुझे यूं प्यार करेगा’ आणि ‘गोरी तू लठ्ठ मार’ यासारखी हिट गाणी गाणारी गायिका पलक ...

The singer called 'this' singer to call! Failure to refuse !! | ​ चाहत्याने ‘या’ गायिकेला फोन करून बोलवले भेटायला! नकार दिल्यावर केला असा कारनामा!!

​ चाहत्याने ‘या’ गायिकेला फोन करून बोलवले भेटायला! नकार दिल्यावर केला असा कारनामा!!

googlenewsNext
्रेम रतन धन पायो’,‘कौन तुझे यूं प्यार करेगा’ आणि ‘गोरी तू लठ्ठ मार’ यासारखी हिट गाणी गाणारी गायिका पलक  मुछाल ही सध्या पोलिस ठाण्याच्या फे-या मारतेय. होय, पलकने पोलिस ठाण्यात एका माथेफिरूविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा माथेफिरू पलकचा पिच्छा पुरवत असून तिला त्रास देत होता. शिवाय काही अनोळखी क्रमांकावरून फोन कॉल्स आणि मॅसेजही पाठवत होता.
प्राप्त माहितीनुसार, सुरूवातीला या कॉलरने पलकचा चाहता बनून फोन केला. मी तुझा खूप मोठा चाहता आहे, असे सांगून त्याने पलकला भेटायची विनंती केली. पलकने भेटण्यास नकार देताच या चाहत्याने तिला त्रास देणे सुरू केले. वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन व मॅसेज करण्याचा सपाटा त्याने लावला. आधी पलकने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर तो अश्लिल व धमकीचे मॅसेज करू लागला. या सगळ्या प्रकारानंतर पलकने पोलिसांत जाणेचं योग्य समजले. दरम्यान पलकच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या आरोपीस अटक केली. ३० वर्षांच्या या आरोपीचे नाव राजेश शुक्ला आहे. विशेष म्हणजे, तो पेशाने एक प्रोफेसर आहे. दोन आठवड्यांपूर्वी तो बिहारच्या सासाराम येथून मुुंबईत आला होता. पलकला भेटायच्या उद्देशाने त्याने मुंबई गाठली होती. फिल्म डायरेक्ट्रीमधून त्याला पलकचा मोबाईल क्रमांक मिळवला होता.

ALSO READ : ताज महोत्सवात सिंगर पलक मुछालच्या आईसोबत गैरवर्तन ! मंचावर हाणामारी !!

पलक मुछाल भाऊ पलाश मुछालसोबत  भारतभर संगीताचे कार्यक्रम प्रस्तुत करते व त्यामधून मिळणारी रक्कम आर्थिक आधाराची गरज असलेल्या गरीब व हृदयविकाराचा आजार असलेल्या मुलांच्या इलाजावर खर्च करते. मे २०१३ पर्यंत तिच्या मुछाल हार्ट फाऊंडेशनने अडीच कोटींची रक्कम गोळा करत, ५७२ मुलांचा जीव वाचवला आहे. पलकच्या या समाजकार्यातील योगदानासाठी तिचे नाव गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे
२०११ मध्ये तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून करिअर सुरू केले.  ‘एक था टायगर’, ‘आशिकी २’, ‘प्रेम रतन धन पायो’ इत्यादी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

Web Title: The singer called 'this' singer to call! Failure to refuse !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.