पहिला संसार मोडला! ५० व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' गायक; १६ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:27 IST2025-10-16T13:24:07+5:302025-10-16T13:27:39+5:30
५० व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' गायक; दोघांच्या वयामध्ये आहे इतकं अंतर

पहिला संसार मोडला! ५० व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' गायक; १६ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
Bollywood Singer: प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे अगदी खरं आहे. याची प्रचिती अनेकदा आपल्याला येते. माणूस कधी, कुठे आणि कोणाच्या प्रेमात पडेल हे काही सांगता येत नाही. हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार, सेलब्रिटींच्या लव्हस्टोरीज तुम्ही ऐकल्या असतील. सध्या हिंदी सिनेसृष्टीत अशीच एक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय संगीतकार, गायक रघु दीक्षित वयाच्या ५० व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत.
संगीतकाराने २००५ मध्ये कोरिओग्राफर, नृत्यांगना मयुरी उपाध्यायबरोबर लग्न केलं. मात्र, २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जवळपास ६ वर्षानंतर गायक दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. त्याची 'म्हैसूर से आयी' आणि 'हे भगवान' ही गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,रघु दीक्षित या बासरीवादक आणि गायिका वरिजाश्री वेणुगोपालसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यादरम्यान, बोलताना ते म्हणाले, “खरं सांगायचं तर, मला ते अपेक्षित नव्हतं. मी आयुष्यभर एकटं राहण्यासाठी स्वतःला तयार केलं होतं, पण नशीबात काही भलतंच लिहिलेलं होतं.
त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं,"मैत्रीपासून सुरु झालेल्या नात्याचं प्रेमात रुपांतर झालं. आमच्या आवडी समान आहेत आणि आम्ही एकमेकांशी खोलवर जोडलेले आहोत.तिच्या पालकांच्या आशीर्वादाने, आम्ही आमच्या आयुष्याचा हा नवीन अध्याय एकत्र सुरू करण्यास उत्सुक आहोत." दरम्यान, रघु दीक्षित यांच्या लग्नाबद्दल इतर कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रघु दीक्षित आणि वरिजाश्री वेणुगोपाल यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या वयामध्ये साधारण १६ वर्षांचं अंतर आहे. रघु दीक्षित यांचं वय ५० वर्ष आहेतर वरिजाश्री ३४ वर्षांची आहे. लवकरच हे दोघं त्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात करणार आहेत.