Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 10:47 IST2025-05-06T10:46:26+5:302025-05-06T10:47:05+5:30

कियारा प्रेग्नंच असून नुकतेच तिने MET GALA मध्ये पदार्पण केलं. मेट गालाच्या रेड कार्पेटवर तिने बेबी बंप फ्लॉन्ट केला.

Siddharth Malhotra takes care of pregnant kiara advani who made debut in met gala 2025 | Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

Sid-Kiara at Met Gala 2025: हिंदी सिनेसृष्टीतील मोस्ट रोमँटिक कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani)  लवकरच आईबाबा होणार आहेत. तर दुसरीकडे गरोदर असताना कियाराने मेट गाला २०२५ मध्ये पदार्पण केलं आहे. मेट गालाच्या रेड कार्पेटवर कियाराने बेबी बंप फ्लॉन्ट केला. कियाराच्या सोबत राहण्यासाठी सिद्धार्थही न्यूयॉर्कमध्येच होता. सिद्धार्थ आणि कियाराचा हातात हात घालून फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सिद्धार्थ मल्होत्रा कियारासोबत न्यूयॉर्कमध्ये असल्याने अनेकांना असं वाटलं की तोही कियारासोबत मेट गालामध्ये पदार्पण करणार आहे. पण असं झालं नाही. सिद्धार्थ फक्त कियाराच्या सोबत राहण्यासाठी तिथे गेला आहे. ब्लॅक आणि गोल्डन थीममध्ये कियाराचा लूक पाहून सगळेच फिदा झालेत. रेड कार्पेटवर जाण्यापूर्वी तो कियारासोबतच होता आणि तिची काळजी घेत होता. त्यांचा हातात हात घासून फिरतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये सिद्धार्थ ब्लॅर रंगाच्या कॅज्युअल वेअरमध्ये एकदम हँडसम दिसतोय.


इतकंच नाही तर सिद्धार्थने कियाराची पोस्ट शेअर करत 'ब्रेव्हहार्ट्स' असं कॅप्शनही दिलं. कियारा आणि होणाऱ्या बाळाला संबोधून त्याने हे कॅप्शन दिलं ज्याचं सगळेच कौतुक करत आहेत. 

कियाराशिवाय मेट गालामध्ये यावेळी शाहरुख खान आणि दिलजीत दोसांझनेही डेब्यू केले. त्यांच्या लूकची सोशल मीडियावर स्तुती होत आहे. ब्लॅक आऊटफिट आणि गोल्डन ज्वेलरीमध्ये शाहरुख 'किंग'दिसत होता. तर दिलजीत दोसांझने व्हाईट आऊटफिट आणि पगडीमध्ये महाराजा लूकमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच प्रियंका चोप्रा, ईशा अंबानी यांनीही मेट गालामध्ये हजेरी लावली.

Web Title: Siddharth Malhotra takes care of pregnant kiara advani who made debut in met gala 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.