सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीचा 'शेरशहा' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 20:22 IST2021-07-22T20:21:17+5:302021-07-22T20:22:04+5:30

शेरशहाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

Siddharth Malhotra and Kiara Advani's 'Sher Shah' trailer to be released on this day | सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीचा 'शेरशहा' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीचा 'शेरशहा' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी येणार भेटीला

बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपट 'शेरशहा' बटालियनची कमान सांभाळायला आणि नेतृत्व करायला पूर्णपणे सज्ज असून या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. "ये दिल मांगे मोर" ही ललकारी देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा घुमणार आहे. शेरशहाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 


शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली असून १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे.


विष्णू वर्धन यांचे दिग्दर्शन आणि धर्मा प्रोडक्शन्स व काश एंटरटेनेमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘शेरशाह’ हा बॉलीवूडचा या वर्षातील सर्वात मोठा युद्ध नाट्य चित्रपट असेल आणि हा रोमांचक चित्रपट १२ ऑगस्टला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.


आपले ‘शेरशाह’ हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते.शेरशाह चित्रपट १२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: Siddharth Malhotra and Kiara Advani's 'Sher Shah' trailer to be released on this day