बॉलिवूडमध्ये भाषा आणि दिसण्यावरुन भेदभाव, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला "टॅलेंटपेक्षा इंग्रजीला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 09:48 IST2026-03-09T09:41:26+5:302026-03-09T09:48:00+5:30

बॉलिवूडमध्ये भेदभाव होत असल्याचे अभिनेत्यानं सांगितलं.

Siddhant Chaturvedi On Bollywood Fake Culture Accent Discrimination Interview | बॉलिवूडमध्ये भाषा आणि दिसण्यावरुन भेदभाव, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला "टॅलेंटपेक्षा इंग्रजीला..."

बॉलिवूडमध्ये भाषा आणि दिसण्यावरुन भेदभाव, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला "टॅलेंटपेक्षा इंग्रजीला..."

बॉलिवूडमध्ये कोणत्याही 'गॉडफादर'शिवाय स्वतःची ओळख निर्माण करणे सोपे नसते. पण, असे काही मोजके अभिनेते आहेत, ज्यांनी ते करुन दाखवलं आहे. त्यापैकी एक आहे सिद्धांत चतुर्वेदी. प्रत्येक भूमिकेत सिद्धांतने आपली छाप सोडली आहे.  जेव्हा तो बॉलिवूडमध्ये आला, तेव्हा त्याचा संघर्ष सोपा नव्हता. नुकतंच एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील 'फेक' कल्चर आणि भाषेवरून होणाऱ्या भेदभावावर अभिनेत्यानं सडेतोड भाष्य केलं आहे.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धांत चतुर्वेदीनं आपल्या बॉलिवूड प्रवासावर भाष्य केलं. तो म्हणाला, "इंडस्ट्रीत आल्यावर मीही गर्दीत मिसळण्याचा प्रयत्न केला. 'जसा देश तसा वेष' करून पाहिला, पण त्यात मी स्वतःलाच हरवत होतो. मी फक्त इतरांकडून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत होतो".

बॉलिवूडच्या हाय-प्रोफाईल पार्ट्यांबद्दल सिद्धांत म्हणाला, "तिथे टॅलेंटची कदर फारशी होत नाही. तुम्ही काय कपडे घातलेत, तुमची बॅकग्राउंड काय आहे आणि तुम्ही कोणत्या लहेजात (Accent) बोलता, यावर तुम्हाला गुण दिले जातात. जर तुम्ही शुद्ध हिंदी बोललात, तर लोक तुमच्याकडे अशा नजरेने पाहतात की जणू त्यांना काही समजतच नाहीये".

सिद्धांतनं सांगितलं की, त्याला अनेकांनी म्हटलं की तो तो टिपिकल बॉलिवूड हिरोसारखे दिसत नाही. त्यांच्या कुरळ्या केसांवर आणि हिंदी बोलण्याच्या लहेजावरही टिप्पणी केली जायची. मात्र, या सगळ्या गोष्टी असूनही त्यांनी हार मानली नाही आणि अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहिले.

व्ही. शांताराम यांच्या बायोपिकमध्ये दिसणार
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये सिद्धांत मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिजीत शिरीष देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, यामध्ये तमन्ना भाटिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, तो दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या आगामी चित्रपटातही दिसेल, ज्याचे कथानक त्याच्या मूळ गावी म्हणजेच 'बलिया'मध्ये आधारित आहे.

Web Title : भाषा और दिखावट पर बॉलीवुड में भेदभाव: सिद्धांत चतुर्वेदी का खुलासा

Web Summary : सिद्धांत चतुर्वेदी ने बॉलीवुड के 'फर्जी' कल्चर को उजागर किया, भाषा और दिखावट के आधार पर भेदभाव पर प्रकाश डाला। उन्होंने अपनी हिंदी लहजे और दिखावट पर टिप्पणियों का सामना किया, लेकिन डटे रहे। अब शांताराम की बायोपिक में दिखेंगे।

Web Title : Siddhant Chaturvedi reveals bias in Bollywood based on language, looks.

Web Summary : Siddhant Chaturvedi exposes Bollywood's 'fake' culture, highlighting discrimination based on language and appearance. He faced comments on his looks and Hindi accent, but persevered. Chaturvedi will star in V. Shantaram's biopic and a film by Abhishek Chaubey.