बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; ६० कोटींचं बजेट असलेला 'हा' चित्रपट आता ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:37 IST2025-10-14T16:14:09+5:302025-10-14T16:37:46+5:30
६० कोटींचं बजेट असलेला 'हा' चित्रपट आता ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिला?

बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; ६० कोटींचं बजेट असलेला 'हा' चित्रपट आता ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिला?
Ott Trending Movie: ओटीटीवर रोज नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट रिलीज होतात. अनेकांना डिजीट प्लॅटफॉर्मवरील चित्रपट पाहायला आवडतात. २०२५ मध्ये बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले. त्यातील काहींची चर्चा झाली पण काही चित्रपट फारसे चालले नाही. असाच एक चित्रपट ज्याने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात अयशस्वी ठरला. मात्र, आता ओटीटीवर या चित्रपटाला सर्वाधिक पसंती मिळतेय. इतकंच नाहीतर ओटीटीवर रिलीज होताच या चित्रपटाने टॉप १० मध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे.
शाझिया इकबाल दिग्दर्शित 'धडक-२' हा सिनेमा १ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. पण, बॉक्स ऑफिसवर 'धडक' सारखी हवा 'धडक २'ला मात्र करता आली नाही. प्रेमकहाणीवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आकर्षित करु शकला नाही. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यात मुख्य भूमिकेत होते. जातीय भेदभाव आणि सामाजिक दडपशाहीवर भाष्य करणारी ही कथा तमिळ चित्रपट 'परियेरुम पेरुमल'चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २६ सप्टेंबर रोजी ओटीटीवर रिलीज करण्यात आला.
आता, हाच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. धडक २ नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि ट्रेंडिंग लिस्टमध्ये आधीच अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात फक्त २९ कोटींचा व्यवसाय केला होता.