श्वेता नंदा बच्चनचे सासरे राजन नंदा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 09:41 IST2018-08-06T09:40:17+5:302018-08-06T09:41:30+5:30

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हिचे सासरे राजन नंदा यांचे निधन झाले. रविवारी रात्री गुडगावस्थित एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Shweta Nanda Bachchan's father-in-law, Rajan Nanda, died | श्वेता नंदा बच्चनचे सासरे राजन नंदा यांचे निधन

श्वेता नंदा बच्चनचे सासरे राजन नंदा यांचे निधन

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हिचे सासरे राजन नंदा यांचे निधन झाले. रविवारी रात्री गुडगावस्थित एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली. ऋषी कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने इन्स्टाग्रामवर राजन नंदा यांचा फोटो शेअर करत श्रद्धांजली दिली.
राजन नंदा Escorts ग्रूपचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज कपूर यांची मुलगी रितु नंदा या राजन नंदा यांच्या पत्नी होत. त्यांना निखील नंदा आणि नताशा नंदा अशी दोन मुले आहेत. राजन यांचा मुलगा निखील नंदा अमिताभ यांचा जावई आहे.

Web Title: Shweta Nanda Bachchan's father-in-law, Rajan Nanda, died