श्रद्धा कपूरला लगीनघाई! लवकरच करू शकते ‘बॉयफ्रेन्ड’ रोहन श्रेष्ठासोबत लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 12:43 IST2019-03-22T12:42:26+5:302019-03-22T12:43:04+5:30

यंदा अभिनेता वरूण धवन गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लग्न करणार आहे. येत्या एप्रिलमध्ये फरहान अख्तरही लग्न करणार आहे. शिवाय बॉलिवूडची एक टॉपमोस्ट अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या लग्नाची चर्चाही जोरात आहे.

shsraddha kapoor may tie the knot with rumoured boyfriend rohan shrestha | श्रद्धा कपूरला लगीनघाई! लवकरच करू शकते ‘बॉयफ्रेन्ड’ रोहन श्रेष्ठासोबत लग्न!!

श्रद्धा कपूरला लगीनघाई! लवकरच करू शकते ‘बॉयफ्रेन्ड’ रोहन श्रेष्ठासोबत लग्न!!

ठळक मुद्देरोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे.

बॉलिवूडचे वेडिंग सीझन तूर्तास तरी संपण्याची चिन्हे नाहीत. सर्वप्रथम अनुष्का शर्मा- विराट कोहली यांनी लग्नगाठ बांधली. पाठोपाठ सोनम कपूर- आनंद अहुजा, दीपिका पादुकोण-रणवीर सिंग, प्रियंका चोप्रा-निक जोनास हे लग्नबंधनात अडकले. यंदा अभिनेता वरूण धवन गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लग्न करणार आहे. येत्या एप्रिलमध्ये फरहान अख्तरही लग्न करणार आहे. शिवाय बॉलिवूडची एक टॉपमोस्ट अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या लग्नाची चर्चाही जोरात आहे.

होय, ताजी बातमी खरी मानाल तर श्रद्धा बॉयफ्रेन्ड रोहन श्रेष्ठासोबत लग्न करू शकते. श्रद्धा ३३ वर्षांची झाली आहे आणि त्यामुळे तिच्यावरचा  लग्नासाठीचा दबाव वाढला आहे. श्रद्धाने लवकरात लवकर लग्न करावे, अशी तिच्या पालकांची इच्छा आहे. सूत्रांचे मानाल तर पालकांच्या इच्छेखातर श्रद्धानेही लग्नाची गोष्ट मनावर घेतली आहे. त्यामुळे सगळे काही जुळून आलेच तर येत्या वर्षात श्रद्धा व रोहन लग्नबंधनात अडकू शकतात.

श्रद्धा व रोहन दोघेही सुमारे वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. श्रद्धा व रोहन एकमेकांचे जुने मित्र. पण सध्या हे नाते मैत्रिपलीकडे गेले आहे. खरे तर आत्तापर्यंत दोघांनीही हे रिलेशनशिप उघड होऊ न देण्याचे आटोकाट प्रयत्न केलेत. पण शेवटी लपवून-लपवून किती लपवणार? काही प्रसंगी अप्रत्यक्ष का होईना, हे प्रेम जगाला दिसलेच. सोशल मीडियावरही या प्रेमाचे काही अप्रत्यक्ष संकेत मिळाले.  
रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे. रोहन याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे.

Web Title: shsraddha kapoor may tie the knot with rumoured boyfriend rohan shrestha