Emergency : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:30 AM2022-07-27T11:30:13+5:302022-07-27T11:30:46+5:30

Emergency : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या बहुचर्चित या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे.

Shreyas Talpade to play Atal Bihari Vajpayee in kangana ranaut Emergency | Emergency : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक

Emergency : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut)  ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली. कंगना राणौत या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारते आहे. चित्रपटातील कंगनाचा लूक तुम्ही पाहिला आहेच. काही दिवसांपूर्वी  या चित्रपटातील अभिनेते  अनुपम खेर यांचा लूक रिलीज करण्यात आला होता. अनुपम हे या चित्रपटात जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. आता या चित्रपटामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा लूक समोर आला आहे. होय, मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयींची  (Atal Bihari Vajpayee) भूमिका साकारताना दिसणार आहे. 

श्रेयसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटामधील लूक दिसत आहे. ‘दूरदर्शी, खरे देशभक्त आणि जनसामान्यांचा माणूस अशी ओळख असणारे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. या गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मला आशा आहे की मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेन,’असं त्याने म्हटलं आहे. पुढे श्रेयसने कंगनाचंही कौतुक केलं आहे. ‘मला ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी कंगनाचे आभार मानतो. कंगना, तू आपल्या देशातील प्रतिभावान अभिनेत्री आहेस. तसेच एक उत्तम दिग्दर्शिका देखील आहेस,’ असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पोस्टमध्ये श्रेयसनं अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता देखील लिहिली आहे.  


  
काही दिवसांपूर्वी कंगनाने ‘इमर्जन्सी’चा टीझर  शेअर केला होता. या टीझरने अनेकांचे लक्ष वेधले.  इमर्जन्सी चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनाची आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केलं आहे.  

Web Title: Shreyas Talpade to play Atal Bihari Vajpayee in kangana ranaut Emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.