ना वडिलांचं अंत्यदर्शन ना पतीचं शेवटचं दर्शन, बॉलिवूडमधील माय-लेकाची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 12:03 PM2021-04-23T12:03:51+5:302021-04-23T12:20:36+5:30

श्रवण राठोड यांना गेल्या 48 तासांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

Shravan rathod funeral elder son and wife can not have his last visit | ना वडिलांचं अंत्यदर्शन ना पतीचं शेवटचं दर्शन, बॉलिवूडमधील माय-लेकाची व्यथा

ना वडिलांचं अंत्यदर्शन ना पतीचं शेवटचं दर्शन, बॉलिवूडमधील माय-लेकाची व्यथा

googlenewsNext

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण  (Nadeem Shravan) यांच्या जोडीमधील श्रवण राठोड यांचे 22 एप्रिलला गुरुवारी रात्री निधन झाले. महिमाच्या  रहेजा हॉस्पिलटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 48 तासांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या टीमने त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. 

श्रवण यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. नदीम यांना तर मोठा धक्का बसला आहे.तर दुसरीकडे श्रवण कुमार यांचे अंतिम दर्शनसुद्धा त्यांची पत्नी आणि मुलगा घेऊ शकत नाहीत. कारण दोघे दोघेही कोरोना पॉझिटीव्ह आहे. श्रवण कुमार यांची पत्नी आणि मुलावर अंधेरीच्या सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांनाही संसर्ग झाला होता. नदिम सैफी आणि श्रवण राठोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नदिम यांचे नाव आल्यानंतर ही जोडी तुटली. नदिम गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होते. नदिम श्रवण यांच्या जोडीने दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, जान तेरे नाम, धडकन, राजा, परदेस, दिलवाले यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले असून त्यांची सगळीच गाणी आजही हिट आहेत.

Web Title: Shravan rathod funeral elder son and wife can not have his last visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.