श्रद्धा का मारतेय फरहानच्या घराला चकरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 12:40 IST2016-12-28T12:40:56+5:302016-12-28T12:40:56+5:30
निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी ‘रॉक आॅन २’ मध्ये एकत्र काम केले. बॉक्स आॅफिसवर चित्रपट आपटला ...

श्रद्धा का मारतेय फरहानच्या घराला चकरा?
न र्माता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी ‘रॉक आॅन २’ मध्ये एकत्र काम केले. बॉक्स आॅफिसवर चित्रपट आपटला असला तरीही यानंतर फरहान-श्रद्धा यांच्यातील जवळीक वाढली. फरहानने यादरम्यान पत्नी अधुनापासून घटस्फोट घेतला. श्रद्धासोबत डेटिंगला गेल्यावर फरहानला माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांच्या भडिमाराला तोंड द्यावे लागत असे. तेव्हा तो आम्ही केवळ ‘जस्ट फ्रेंडस’ म्हणून विषय टाळायचा.
![]()
नुकतीच श्रद्धा फरहानच्या घराला चकरा मारताना दिसली... त्यांच्यात नक्कीच काहीतरी शिजतेय, असे जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा..तुमचा गैरसमज होतोय. कारण, ‘रॉक आॅन ३’ चित्रपटाविषयी प्लॅनिंग सुरू झाले आहे. पुन्हा एकदा ‘रॉक आॅन २’ ची टीम एकत्र येणार आहे, ही एक खुशखबर आहे. कलाकारांच्या तारखा, स्क्रिप्ट याविषयी बोलणी सुरू झाली आहेत.
![]()
‘रॉक आॅन २’ टीममधील कलाकार अर्जुन रामपाल, पत्नी मेहेर जेसिआ यांच्यासह श्रद्धा कपूर हे वांद्रे येथील फरहानच्या घराबाहेर आलेले माध्यमांना दिसले. अर्जुन-मेहेर हे कॅज्युअल ड्रेसिंगमध्ये दिसले. तसेच श्रद्धा ही लाल रंगाच्या कुर्तीमध्ये आली होती. माध्यमांच्या प्रश्नांना टाळण्यासाठी तिने फोनवर चॅटिंगला सुरूवात केली. सध्या ती आदित्य रॉय कपूरसोबत ‘ओके जानू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच ‘रईस’चा निर्माता फरहान अख्तर असल्याने तो देखील प्रमोशनमध्ये बिझी आहे. एकंदर काय, ‘रॉक आॅन २’ टीम पुन्हा एकत्र दिसणार तर...!