श्रद्धा कपूरने कन्फर्म केलं नातं? फोन वॉलपेपरवर दिसला रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:03 IST2025-03-03T15:02:54+5:302025-03-03T15:03:17+5:30

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर आज तिचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे.

Shraddha Kapoor's relationship confirmed through her phone wallpaper! She was seen in a romantic mood with her rumored boyfriend | श्रद्धा कपूरने कन्फर्म केलं नातं? फोन वॉलपेपरवर दिसला रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो

श्रद्धा कपूरने कन्फर्म केलं नातं? फोन वॉलपेपरवर दिसला रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो

बॉलिवूडच्या टॅलेंटेड अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आज तिचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. अभिनेत्री शेवटची सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 'स्त्री २' चित्रपटात दिसली होती. अभिनयासोबतच श्रद्धा तिच्या सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा अनेकदा तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. याशिवाय ती तिच्या डेटींग लाईफमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. श्रद्धा कपूरचे नाव अनेकदा राहुल मोदींसोबत जोडले जाते. दरम्यान, अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही विश्वास ठेवायला तयार व्हाल की ती राहुल मोदीला डेट करत आहे. 


मुंबईत तिच्या वाढदिवसाला स्पॉट झालेली श्रद्धा कपूर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. त्याचवेळी, त्यांनी तिच्या फोनवर काहीतरी पाहिले ज्यामुळे तिच्या लव्ह लाइफमधील सीक्रेट समोर आले आहे. आत्तापर्यंत अभिनेत्रीने तिच्या लव्ह लाईफबद्दल कोणतेही अपडेट दिलेले नाही. पण व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर तिच्या फोनच्या वॉलपेपरवर तिचा आणि राहुल मोदीचा फोटो पाहायला मिळतोय. व्हिडीओमध्ये दिसतंय की, श्रद्धा तिच्या कारच्या दिशेने येताच तिच्या फोनचे पॉवर बटण चुकून दाबले गेले, ज्यामुळे तिच्या फोनचा वॉलपेपर समोर आला. या वॉलपेपरमध्ये श्रद्धा कपूर आणि तिचा प्रियकर राहुल मोदी यांचा रोमँटिक फोटो होता. आता या फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

श्रद्धा आणि राहुलची लव्हस्टोरी
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांनी अद्याप ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केलेले नाही. पण दोघांमधील प्रेमाची सुरुवात चित्रपटांच्या सेटपासून झाली. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र, श्रद्धाचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये अभिनेत्री कोणाच्यातरी लग्नाला हजर राहण्यासाठी आली होती. विशेष म्हणजे यावेळी राहुल मोदीही तिच्यासोबत होते.

Web Title: Shraddha Kapoor's relationship confirmed through her phone wallpaper! She was seen in a romantic mood with her rumored boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.