श्रद्धा कपूरला मिळाले ‘लव्ह’! बी-टाऊनमध्ये नव्या ‘कपल’ची चर्चा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 10:50 IST2018-08-22T10:49:52+5:302018-08-22T10:50:21+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये ‘लव्ह सीझन’ सुरू आहे. बी-टाऊनमधील नव्या कपल्स, नव-नव्या बातम्या कानावर येत आहेत. आता आणखी एका नव्या-कोऱ्या जोडप्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय. 

Shraddha Kapoor’s Instagram post gets love from someone | श्रद्धा कपूरला मिळाले ‘लव्ह’! बी-टाऊनमध्ये नव्या ‘कपल’ची चर्चा!!

श्रद्धा कपूरला मिळाले ‘लव्ह’! बी-टाऊनमध्ये नव्या ‘कपल’ची चर्चा!!

सध्या बॉलिवूडमध्ये ‘लव्ह सीझन’ सुरू आहे. बी-टाऊनमधील नव्या कपल्स, नव-नव्या बातम्या कानावर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी सोनम कपूर- आनंद आहुजा चर्चेत होते. मग प्रियांका चोप्रा-निक जोनासची चर्चा झाली. यानंतर रणवीर सिंग-दीपिका पादुकोणही चर्चेत राहिले. आता आणखी एका अशाच नव्या-कोऱ्या जोडप्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय. होय, श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा. बॉलिवूडच्या नव्या कपलच्या यादीत आता श्रद्धा व रोहनचे नाव सामील झाले आहे.

 श्रद्धा व रोहन एकमेकांचे जुने मित्र. पण सध्या हे नाते मैत्रिपलीकडे गेल्याचे कळतेय. खरे तर आत्तापर्यंत दोघांनीही हे रिलेशनशिप उघड होऊ न देण्याचेचं प्रयत्न केलेत. पण शेवटी लपवून-लपवून किती लपवणार. काही प्रसंगी अप्रत्यक्ष का होईना, हे प्रेम जगाला दिसलेय. सोशल मीडियावरही या प्रेमाचे काही अप्रत्यक्ष संकेत मिळाले. होय, श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोत श्रद्धा फॅमिलीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसतेय. श्रद्धाच्या या पोस्टला रोहनने दिलेला रिप्लाय तुम्ही खाली बघू शकता. होय, हे ‘लव्ह साईन’ बरेच काही सांगणारे आहे.

 

रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे. रोहन याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे.

Web Title: Shraddha Kapoor’s Instagram post gets love from someone