'स्त्री २'नंतर श्रद्धा कपूरचा वधारला भाव! एकता कपूरच्या सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:57 IST2025-05-19T12:56:36+5:302025-05-19T12:57:26+5:30
'स्त्री २' (Stree 2) चित्रपटापासून अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चर्चेत आहे.

'स्त्री २'नंतर श्रद्धा कपूरचा वधारला भाव! एकता कपूरच्या सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता
'स्त्री २' (Stree 2) चित्रपटापासून अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चर्चेत आहे. श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, एकता कपूर श्रद्धा कपूरला तिच्या चित्रपटासाठी साइन करू इच्छित असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. श्रद्धा कपूरने या चित्रपटासाठी १७ कोटी आणि नफ्यात वाटा मागितला. पण आता त्यात एक ट्विस्ट आला आहे.
पीपिंगमूनच्या रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर या चित्रपटातून बाहेर पडली आहे. मानधनामुळे श्रद्धा कपूर आता एकता कपूरच्या चित्रपटाचा भाग नाही. एकताला वाटले की, श्रद्धा चित्रपटासाठी जास्त फी मागत आहे. एकता महिला-केंद्रीत चित्रपट बनवत आहे. एकताला भीती होती की यामुळे संपूर्ण बजेट वाया जाऊ शकते. श्रद्धा चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे, निर्माते आता मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री शोधत आहेत. निर्माते एका मोठ्या अभिनेत्रीशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. यावर एकता कपूर किंवा श्रद्धा कपूरकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
या चित्रपटात दिसणार श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती स्त्री ३ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी सारखे कलाकार आहेत. श्रद्धा कपूर तू झुठी मैं मकर, साहो, स्ट्रीट डान्सर थ्रीडी, छिछोरे, हसिना पारकर, बत्ती गुल मीटर चालू, आशिकी २ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.