'एबीसीडी ३' चित्रपटात श्रद्धा कपूर दिसणार ह्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 07:54 PM2019-01-28T19:54:08+5:302019-01-28T19:54:51+5:30

'एबीसीडी' आणि 'एबीसीडी २' चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 Shraddha Kapoor will appear in the film 'ABCD 3' | 'एबीसीडी ३' चित्रपटात श्रद्धा कपूर दिसणार ह्या भूमिकेत

'एबीसीडी ३' चित्रपटात श्रद्धा कपूर दिसणार ह्या भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे'एबीसीडी ३' केवळ डान्सवर आधारित श्रद्धा कपूर एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत


'एबीसीडी' आणि 'एबीसीडी २' चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच याबद्दलची घोषणा केली गेली. यासोबतच या चित्रपटात अपारशक्ती खुराणादेखील झळकणार असल्याची माहिती फोटो शेअर करत दिली गेली. आता चित्रपटातील श्रद्धाच्या भूमिकेबद्दलही माहिती समोर आली आहे.

'एबीसीडी ३' या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहेत. चित्रपटात श्रद्धा आणि वरूणमध्ये कोणताही रोमँटिक अँगल दाखवणार नसून चित्रपट केवळ डान्सवर आधारित असणार असल्याचे रेमोने म्हटले होते. अशात चित्रपटात श्रद्धाची भूमिका काय असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात श्रद्धा कपूर एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी ती सध्या डान्सचे धडेदेखील घेत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सध्या अमृतसरमध्ये सुरूवात झाली असल्याचे म्हटले जात आहे. 


'एबीसीडी ३' चित्रपटाच्या निमित्ताने वरुण आणि श्रद्धा पुन्हा एकत्र काम करणार असल्यामुळे हे दोघेही कोणती भूमिका साकारणार याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच वरुणने श्रद्धा कोणती भूमिका साकारणार हे स्पष्ट केले आहे. या चित्रपटामध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार असल्याचा खुलासा वरूणने केला आहे.

‘एबीसीडी ३’ मध्ये वरुणसोबतच श्रद्धाचीदेखील महत्वाची भूमिका असल्यामुळे ती सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. प्रशांत शिंदे आणि तानिया यांच्याकडून श्रद्धा नृत्याचे धडे गिरवत आहे. प्रशांत आणि तानियाकडून श्रद्धा वेगवेगळे ५ नृत्यप्रकार शिकत आहे. यामध्ये Afro, Krump, Locking या डान्सप्रकारांचा समावेश आहे. श्रद्धाला पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title:  Shraddha Kapoor will appear in the film 'ABCD 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.