श्रद्धा कपूर लग्न करतेय? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:18 IST2026-03-18T12:18:08+5:302026-03-18T12:18:42+5:30

श्रद्धाच्या लग्नाबद्दल तिची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी भाष्य केलंय. 

Shraddha Kapoor Wedding Rumours Tejaswini Kolhapure Reaction Rahul Mody | श्रद्धा कपूर लग्न करतेय? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

श्रद्धा कपूर लग्न करतेय? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Shraddha Kapoor Wedding : श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे चाहते तिला पाहण्यासाठी, तिचे चित्रपट पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. याचं कारण म्हणजे श्रद्धाचं काम आणि आपल्या हसत-खेळत स्वभावानं सगळ्यांना आपलंसं करण्याची तिची कला. श्रद्धाच्या लव्ह लाईफबद्दल तर चाहत्यांमध्ये फार उत्सुकता असते.  श्रद्धा कपूर ही लेखक राहुल मोदी याला डेट करत आहे.  त्यांच्या लग्नाच्याही चर्चा रंगताना दिसून येतात.  अशातच आता श्रद्धाच्या लग्नाबद्दल तिची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी भाष्य केलंय. 

'फ्री प्रेस जर्नल'शी बोलताना तेजस्विनी कोल्हापुरे यांनी श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चेवर आश्चर्य व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, "खरंच? मला याबद्दल काहीच माहिती नाही. मला तर याची कल्पनाही नाही". तेजस्विनी यांनी श्रद्धाचं कौतुक करताना सांगितलं की, तिने आपल्या कुटुंबाची परंपरा उत्तम प्रकारे पुढे नेली आहे. "श्रद्धाने ज्या पद्धतीने कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे", असंही त्या म्हणाल्या.

तेजस्विनी यांनी पुढे सांगितलं की, त्या आणि श्रद्धा एकमेकींच्या कामाबद्दल चर्चा करतात. शूटिंगदरम्यानचे फोटो, व्हिडीओ तसेच वेगवेगळ्या चित्रपटांमधील लुक्स त्या एकमेकींना शेअर करतात. गरज वाटली तरच त्या एकमेकींना सल्ला देतात.

रिलेशनशिप चर्चेत, पण अधिकृत घोषणा नाही

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या नात्याबाबत २०२४ पासून चर्चा सुरू आहे. दोघांना अनेकदा डिनर डेट, व्हेकेशन आणि इव्हेंट्समध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. मात्र, त्यांनी अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही त्यांची केमिस्ट्री चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते. राहुल मोदी हे लेखक आणि फिल्ममेकर आहेत. तर श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल तर ती लवकरच आगामी 'ईठा' या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title : श्रद्धा कपूर की शादी की अफवाहें: मौसी तेजस्विनी कोल्हापुरे ने दी प्रतिक्रिया

Web Summary : तेजस्विनी कोल्हापुरे ने श्रद्धा कपूर की राहुल मोदी से शादी की अफवाहों पर हैरानी जताई। कुछ भी पुष्टि किए बिना, उन्होंने श्रद्धा की परिवार की विरासत को बनाए रखने के लिए प्रशंसा की और उनकी पेशेवर चर्चाओं का उल्लेख किया।

Web Title : Shraddha Kapoor Wedding Rumors: Aunt Tejaswini Kolhapure Reacts with Surprise

Web Summary : Tejaswini Kolhapure expressed surprise at rumors of Shraddha Kapoor's wedding to Rahul Modi. While not confirming anything, she praised Shraddha for upholding the family's legacy and mentioned their professional discussions.