घराबाहेर वडिलांसोबत स्पॉट झाली ही अभिनेत्री, विनामेकअप दिसतेय तितकीच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:06 IST2021-06-09T17:59:24+5:302021-06-09T18:06:54+5:30

या अभिनेत्रीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

shraddha kapoor spotted with shakti kapoor in mumbai | घराबाहेर वडिलांसोबत स्पॉट झाली ही अभिनेत्री, विनामेकअप दिसतेय तितकीच सुंदर

घराबाहेर वडिलांसोबत स्पॉट झाली ही अभिनेत्री, विनामेकअप दिसतेय तितकीच सुंदर

ठळक मुद्देश्रद्धा ही शक्ती कपूर यांची मुलगी असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

श्रद्धा कपूर तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. नुकतेच तिला मुंबईत तिच्या घराच्या खाली पाहाण्यात आले, त्यावेळी तिच्यासोबत तिचे वडील अभिनेते शक्ती कपूर देखील होते. यावेळी श्रद्धाने अजिबातच मेकअप केलेला नव्हता. तिने केसाची एक वेणी बांधली होती आणि चष्मा लावला होता. या साध्या रूपात देखील ती खूपच छान दिसत होती.

श्रद्धाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. मानव मंगलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे.  श्रद्धा खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

श्रद्धा ही शक्ती कपूर यांची मुलगी असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. श्रद्धाच्या साहो आणि छिछोरे या दोन्ही चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title: shraddha kapoor spotted with shakti kapoor in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.