OMG! श्रद्धा कपूरने या खास व्यक्तीसाठी केली मराठीत पोस्ट, चक्क म्हटले आय लव्ह यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 17:30 IST2019-11-03T17:30:00+5:302019-11-03T17:30:02+5:30

श्रद्धाने चक्क पोस्ट मराठीत लिहिली असून ही पोस्ट तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी आहे आणि या पोस्टमध्ये तिने त्या व्यक्तीला आय लव्ह यू देखील म्हटले आहे.

Shraddha Kapoor shares heartwarming birthday post for her bodyguard | OMG! श्रद्धा कपूरने या खास व्यक्तीसाठी केली मराठीत पोस्ट, चक्क म्हटले आय लव्ह यू...

OMG! श्रद्धा कपूरने या खास व्यक्तीसाठी केली मराठीत पोस्ट, चक्क म्हटले आय लव्ह यू...

ठळक मुद्देश्रद्धाने ही पोस्ट कोणासाठी लिहिली आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना... श्रद्धाने ही पोस्ट तिचा बॉडीगार्ड अतुल कांबळेसाठी लिहिली आहे.

शक्ती कपूरच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धा कपूरने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. श्रद्धाच्या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

श्रद्धा कपूरला खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग असून ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. पण नुकतीच श्रद्धाची सोशल मीडियावरची एक पोस्ट तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण ही पोस्ट श्रद्धाने चक्क मराठीत लिहिली असून ही पोस्ट तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी आहे आणि या पोस्टमध्ये तिने त्या व्यक्तीला आय लव्ह यू देखील म्हटले आहे.

श्रद्धा कपूरने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या आयुष्यातील महत्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्या सारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं याला मी माझं भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हवं ते सर्व काही लाभो! I ❤ you. Happy birthday!!!

श्रद्धाने ही पोस्ट कोणासाठी लिहिली आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना... श्रद्धाने ही पोस्ट तिचा बॉडीगार्ड अतुल कांबळेसाठी लिहिली आहे. ही पोस्ट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडली असून श्रद्धाच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती तिच्यासाठी किती खास आहे हे या पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना कळले आहे.  तिने या पोस्टसोबतच इन्स्टाग्राम स्टोरीत तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती अतुलसोबत केक कापताना दिसत आहे.

 

Web Title: Shraddha Kapoor shares heartwarming birthday post for her bodyguard