जपानच्या थिएटरमध्ये 'स्त्री'चा डंका, श्रद्धा कपूर म्हणतेय - सावधान राहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 08:08 PM2020-09-14T20:08:08+5:302020-09-14T20:08:45+5:30

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चित्रपट 'स्त्री'चा डंका आता जपानमध्ये वाजला आहे.

Shraddha Kapoor says 'woman' in Japanese theater - be careful ... | जपानच्या थिएटरमध्ये 'स्त्री'चा डंका, श्रद्धा कपूर म्हणतेय - सावधान राहा...

जपानच्या थिएटरमध्ये 'स्त्री'चा डंका, श्रद्धा कपूर म्हणतेय - सावधान राहा...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा सुपरहिट ठरलेला चित्रपट 'स्त्री'चा डंका आता जपानमध्ये वाजणार आहे. चित्रपट ‘साहो’नंतर भारतीय सीमा ओलांडून वैश्विक चित्रपटाच्या यादींमध्ये समाविष्ट होणारा हा श्रद्धाचा दुसरा चित्रपट आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाने आपल्या भारतातील प्रदर्शनाची दोन यशस्वी वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत. आणि आता देशाच्या सीमा ओलांडून हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे.    

श्रद्धा कपूरने ही अतिशय आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयावर शेअर करताना लिहिले आहे, की 'स्त्री' सर्व जिंकण्यासाठी सज्ज आहे. जपानमध्ये झाला प्रदर्शित. सावधान राहा.



'स्त्री' या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा कपूर प्रथमच हॉरर चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील श्रद्धाचे काम पाहून तिच्या चाहत्यांनी आणि समीक्षकांनी कौतूक केले आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकली. त्यांचे काम प्रेक्षकांना खूप भावले. 

या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर याची कथा कर्नाटकातील ९० च्या दशकात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. कर्नाटकच्या एका गावात रात्री एका स्त्रीचे भूत फिरायचे. हे भूत रात्री लोकांच्या घराचा दरवाजा ठोठवायची आणि जो कुणी दरवाजा उघडायचा, त्याचा मृत्यू व्हायचा. यानंतर या भूतापासून वाचण्यासाठी लोकांनी आपल्या घराच्या भिंतींवर 'कल आना' असे लिहिणे सुरू केले. 


श्रद्धा कपूर रणबीर कपूरसोबत लव रंजन यांच्या दिग्दर्शनातील आपल्या व्यक्तिरेखेच्या तयारीत व्यस्त आहे.

Web Title: Shraddha Kapoor says 'woman' in Japanese theater - be careful ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.